पहाटे 4 ते 5.30 वाटाघाटी, मात्र जरांगे पाटील भूमिकेवर ठाम; आजचा मुक्काम लोणावळा
पुणे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांची तोफ पुण्यात दाखल झाली आहे. दरम्यान आज पहाटे जरांगेंकडे आरक्षणाचा प्रस्ताव घेऊन सरकारचे प्रतिनिधी आले होते, त्यांच्याकडून तपशील देण्यात आला आणि मुंबईचा दौरा टाळण्याचा आग्रहही करण्यात आला होता. मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शिष्टाईसाठी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींना रिकाम्या हाताने परतावे लागले. मराठा आरक्षण आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. […]