ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

मंडल आयोगावरुन भुजबळ-जरांगेंमध्ये दंगल, काय आहे मंडल आयोग? सविस्तर जाणून घेऊया!

मुंबई मराठा समाजाला आरक्षणाचा अध्यादेश जारी केल्यानंतर ओबीसी समाजाकडून विरोध व्यक्त केला जात आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयावर आक्षेप घेतला. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनीही छगन भुजबळांच्या भूमिकेवर तीव्र विरोध केला. जर छगन भुजबळ मराठा आरक्षणाला आव्हान देतील तर आम्हीही मंडल आयोगाला आव्हान देऊ अशा शब्दात प्रत्युत्तर दिलं. यानंतर भुजबळांनाही मनोज […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणातील ‘सगेसोयरे’, ‘गणगोत’वरुन ओबीसी संघटनेचं उच्च न्यायालयात आव्हान

मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी जारी केलेल्या मसुद्यावरून ओबीसी संघटनांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणबाबत घेतलेल्या निर्णयाला ओबीसी संघटनांकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. ओबीसी वेलफेयर फाऊंडेशन तर्फे अॅड मंगेश ससाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या अशी मागणी ओबीसी संघटनेकडून यापूर्वीही करण्यात आली होती. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात ओबीसींची एल्गार यात्रा काढणार : छगन भुजबळ 

X: @NalavadeAnant मुंबई: सरकारने अध्यादेशाचा जो मसुदा तयार करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi caste certificate to Maratha community) देण्याचा निर्णय घेतला आहे, तो पाहता ओबीसी समाजामध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. आमच्या ओबीसी, भटक्या-विमुक्त लेकरांचा घास आज काढून घेतला जात आहे, त्याबद्दल आम्हाला दुःख आणि संताप आहे. बहुसंख्य असलेल्या ओबीसी घटकावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘जरांगेंना दिलेला अध्यादेश नव्हे, मसुदा!’ मराठा आरक्षणाच्या गुलालाला छगन भुजबळांचं आव्हान

मुंबई आरक्षणाच्या बाबतीत 50 टक्क्यांच्या समुद्रात पोहोणाऱ्या मराठा समाजाला आता १७ टक्क्यांमध्ये विहिरीत पोहावं लागणार आहे. झुंडशाहीने नियम कायदे बदलता येत नाही. मंत्रिमंडळात जाताना कुणालाही न घाबरता आम्ही निर्णय घेऊ अशी शपथ घेत असतो, अशा शब्दात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर संताप व्यक्त केला. जरांगे पाटलांना दिलेला जीआर की केवळ एक सूचना आहे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदे समितीला 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या, प्रमाणपत्र देण्याचे मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी माजी न्यायामूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीला ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र देण्याचे आदेश मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे मराठा आरक्षणासाठीचं पहिलं पाऊल मानलं जात आहे. मात्र मनोज जरांगे पाटील ज्यांच्या कुणबी नोंदी […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

६ डिसेंबरनंतर राज्यात दंगली होतील, प्रकाश आंबेडकर यांचा पुनरुच्चार

Twitter : @therajkaran मुंबई राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी राजकारण तापलं असताना प्रकाश आंबेडकरांच्या एका विधानाने भाष्याने राज्यात खळबळ उडाली आहे. निवडणूक निकालानंतर राज्यात दंगली उसळतील या त्यांच्या विधानानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रकाश आंबेडकरांवर थेट एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशातील काही भागात मुस्लिमांना लक्ष्य केले जात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण

छगन भुजबळांच्या मदतीला धावून आले प्रकाश शेंडगे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्र्यांना ओबीसी – मराठा वादात संयम बाळगण्याची सूचना Twitter : @vivekbhavsar मुंबई मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावरून मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय असा वाद पेटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाचे समर्थक आणि मंत्री शंभूराज देसाई […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे; माजी न्यायमूर्तींसह मंत्र्यांच्या शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर घेतला निर्णय..!

Twitter : @NalavadeAnant जालना मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेलं अन्नत्याग आंदोलन आज मागे घेतलं. दोन माजी न्यायमूर्ती आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय चर्चा घडवून पुढील प्रक्रिया केली जाईल असं आश्वासन शिष्टमंडळाकडून देण्यात आलं. आता […]

ताज्या बातम्या मुंबई

पवईत राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी

Twitter मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ मुंबईत मराठा समाज एकवटत आहे. कँडल मोर्चा, साखळी उपोषण आणि प्रवेश बंदीचा बॅनर उभारत मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी करण्यात येत आहेत. या आंदोलनाचे लोण आता मुंबईत पसरले असून पवई, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केली जात आहेत. दरम्यान, पवईतील पंचकुटीर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठवाड्यातील निझामकालीन आणि इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या (cabinet meeting) बैठकीत स्वीकारण्यात आला. अहवाल स्वीकृत केल्यानंतर  मराठवाड्यात (Marathwada) कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र (Kunbi caste certificate) देण्याची कार्यवाही तातडीने सुरू […]