ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘जरांगे हेकेखोर, रोज पलटी मारतो, अनेक गुप्त बैठका घेतो’; अजय महाराज बारस्करांचे धक्कादायक आरोप

मुंबई काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचा शिव्या देत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर अनेकांनी जरांगे पाटलांच्या विधानांवर आक्षेप नोंदवला होता. आता मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढाईतील महत्त्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारस्करांनी जरांगे पाटलांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जरांगे अनेकदा गुप्त बैठका घेतो. यामध्ये उच्च पदस्थ अधिकारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांचं ठरलं; सरकारला इशारा

जालना राज्य सरकारने काल विशेष अधिवेशन घेत मराठा आरक्षणाचं विधेयक विधिमंडळात मंजूर करून घेतलं. मात्र मनोज जरांगे पाटील सरकारच्या या निर्णयावर नाराज आहेत. आम्हाला स्वतंत्र आरक्षण नको, तर ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. आम्हाला सरकारचे आरक्षण मान्य नाही. आता आमच्यापुढे आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही, असा इशारा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मराठा आरक्षण कोर्टात टिकेल यात शंका’, राज्य सरकारच्या विधेयकावर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई विधिमंडळात आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनात राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर केला. मात्र त्याचा पुढचा मार्ग सोपा नसल्याचं सांगितलं जात आहे. मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण कोर्टात टिकेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर शरद पवारांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं. शरद पवार म्हणाले की, कायदेशीर सल्लागारांच्या […]

महाराष्ट्र

मराठा समाजाला १० टक्के आरक्षण…..!

X : @NalavadeAnant मुंबई: राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण न देता शिक्षण, शासकीय व निमशासकीय नोकरीमध्ये वेगळे १० टक्के आरक्षण देणाऱ्या विशेष विधेयकास मंगळवारी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात विधिमंडळात एकमताने चर्चेविना मान्यता देण्यात आली. त्याचवेळी राज्य सरकारने वार्षिक उत्पन्नाचीही अट घातली आहे. या अटीमुळे ज्या व्यक्ती किंवा समूह उन्नत व प्रगत गटात मोडणाऱ्या नाहीत […]

महाराष्ट्र

निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाची दिशाभूल :- ॲड. यशोमती ठाकूर

X : @NalavadeAnant मुंबई: राज्य सरकारने आज मोठा गाजावाजा करत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे. याबद्दल मराठा समाजाचे अभिनंदन. मात्र, हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आहे का? याबाबतची स्पष्टता सरकारला करता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम सरकारने केले आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेसच्या […]

महाराष्ट्र

घाईघाईत काढलेल्या अधिसूचनेचे नेमके काय झाले? : कॉँग्रेसचा सवाल 

X : @therajkaran मुंबई: मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही सर्व राजकीय पक्षांची भूमिका आहे. परंतु हे आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे हे सर्वात महत्वाचे आहे. आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावले, पण या विधेयकावर सरकारने चर्चाही केली नाही. केवळ एकपात्री प्रयोग सादर केला आणि मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आजचा […]

महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार!

X : @milindmane70 मुंबई: मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, आमची स्वतंत्र आरक्षणाची मागणी नव्हती, सरकारने आमची फसवणूक केली आहे, सगेसोयरे या मुद्द्यावर आरक्षण हवे आहे अन्यथा पुन्हा आंदोलन करू, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असल्याचे संकेत राज्यभरातील मराठा समाजातील नेत्यांकडून ऐकण्यास मिळत आहे. राज्य सरकारने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘सरकारने 10 टक्के आरक्षण दिलं म्हणजे नेमकं काय दिलं?’ राज ठाकरेंचा सवाल

मुंबई आज विधिमंडळात आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचं विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं. यावेळी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यात १० टक्के आरक्षणाची तरतूद केल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र ५० टक्क्यांच्या वर गेलेलं हे आरक्षण कोर्टात टिकेल की नाही, असा संशय अनेकांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर जरांगे पाटील ठाम, आंतरवालीत उद्या बोलावली बैठक

जालना विधिमंडळात राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केलं असलं तरीही मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं जावं, या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. यासंदर्भात उद्या आंतरवाली सराटी येथे बैठक घेण्यात येणार असून यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती आहे. मराठा समाजाला ओबीसीतून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षण 10 टक्के; विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

मुंबई विधिमंडळात आजच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही पाठिंबा दर्शविला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी विधेयक सादर करताना मराठा समाजाला न्यायालयात टिकणारं आरक्षण दिल्याचा विश्वास व्यक्त केला. आज विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. आता हे विधेयक विधानपरिषदेत सादर केले जाईल. तेथेही एकमताने मंजूर केल्यानंतर राज्यपालांकडे पाठवण्यात येईल. राज्यपालांच्या […]