‘ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय’, विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई मराठा आरक्षणाच्या विशेष अधिवशेनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. हा मराठा समाजाचा, मराठा ऐक्याचा विजय आहे आणि हा चिकाटीने दिलेल्या लढयाचा विजय आहे. हे आरक्षण कोर्टातही टिकेल आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे