मुंबई ताज्या बातम्या

Divyang: मुंबई मेट्रो-3 मध्ये दिव्यांगांना २५% सवलत; २३ नोव्हेंबरपासून अमलबजावणी; वरिष्ठ पत्रकार दिपक कैतके यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने दिव्यांग प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. मेट्रो-3 मार्गिकेवर दिव्यांग प्रवाशांना देण्यात येणारी २५ टक्के सवलत रविवार, २३ नोव्हेंबरपासून अधिकृतपणे लागू होत आहे. सवलतीची घोषणा होऊन दीड महिना उलटूनही ती प्रत्यक्षात सुरू न झाल्याने दिव्यांग प्रवाशांमध्ये वाढत चाललेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे. एमएमआरसीच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Divyang : दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलतीची मागणी — पत्रकार दीपक कैतके यांची मागणी

मुंबई : राज्यातील एसटी महामंडळात महिला प्रवाशांना प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येते. या रकमेची भरपाई एस टी महामंडळाला शासनाकडून सरकारी तिजोरीतून केली जाते. त्याच धर्तीवर दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलत द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार आणि ‘पत्रकार रुग्णमित्र’ म्हणून ओळखले जाणारे दीपक कैतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, […]

मुंबई ताज्या बातम्या

बोरीवली जैन मंदिराच्या विश्वस्त धर्मानुरागी जिनमती शहा यांचे निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील पोदनपूरा जैन मंदिराच्या संस्थापक विश्वस्त आणि धर्मानुरागी श्रीमती जिनमती शहा यांचे वृध्दापकाळाने शुक्रवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रभादेवी येथील निवासस्थानी निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्या बारामतीतील प्रसिद्ध उद्योगपती श्रीमंत शेठ चंदुकाका सराफ यांच्या कन्या आणि फलटणचे धनाढ्य व्यापारी तसेच जैन समाजाचे आधारस्तंभ चंदुलाल शहा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महापालिकेच्या ताब्यात द्यावे; ६ नोव्हेंबरला अंधेरीत आंदोलनाचा इशारा

मुंबई: अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी होत असून, हे हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता हॉस्पिटलसमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अंधेरी विकास समितीने दिली. या संदर्भात मुंबईचे माजी उपमहापौर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

BMC elections : महापालिका निवडणुकीत विधानसभा मतदान केंद्रे कायम ठेवावीत — आमदार पराग शाह यांची मागणी

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर (पूर्व) विधानसभा क्षेत्राचे आमदार पराग शाह यांनी नागरिकांच्या सोयीसाठी विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने मतदान केंद्रे ठेवण्यात आली होती, तीच व्यवस्था आगामी महापालिका निवडणुकीतही कायम ठेवावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. शाह यांनी म्हटले की, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आणि जास्त मतदारसंख्या असलेल्या इमारतींमध्ये मतदान केंद्रे ठेवण्यात आल्याने मतदारांना मोठी […]

मुंबई ताज्या बातम्या

दामोदर नाट्यगृह पाडले; शाळेच्या नावाखाली खाजगी बिल्डरच्या घशात जागा घालण्याचा डाव?  

X : @Rav२Sachin मुंबई: मुंबईच्या सांस्कृतिक आणि रंगभूमीवरील इतिहासाची गौरवशाली परंपरा जोपासत परळच्या दामोदर नाट्यगृहाने गेल्यावर्षी शतकी वाटचाल पूर्ण केली खरी, मात्र आता नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या संदर्भात सत्य उघडकीस आल्यावर कलाकार मंडळी उपोषणाच्या तयारीत आहेत. या जागेवर शाळा  बांधून उर्वरित जागेचा एफ एस आय खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव रचला जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. […]