ताज्या बातम्या महाराष्ट्र

म्हाडाच्या 56 वसाहतींचे वाढीव सेवा शुल्क माफ, गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची सभागृहात घोषणा

नागपूर म्हाडाच्या 56 वसाहतीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील सन 1998 ते 2021 या कालावधीतील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. यामुळे सुमारे 380.41 कोटींचे वाढीव सेवा शुल्क माफ होणार असून या निर्णयामुळे मुंबईतील 50 हजार सदनिकाधारांना दिलासा मिळाला असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री सावे म्हणाले, बृहन्मुंबईतील म्हाडाच्या 56 वसाहतीतील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मध्यान्ह भोजनातून विषबाधा; सरकारला धरले धारेवर

X: @therajkaran नागपूर: राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे काम पंचवीस जिल्ह्यांत पूर्ण झाले आहे. या महिनाअखेर ते सर्व जिल्ह्यांत पूर्ण होईल, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, चेंबूर, मुंबई येथील महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा या संबंधीच्या प्रश्नाला प्रश्नोत्तर तासात दिले. यावेळी गृहविभागाकडून फोरेन्सिक अहवाल शिघ्रातिशिघ्र मागवू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सोयाबीन-कापूस प्रश्नी शेतकरी नेते तुपकरांची आज पियुष गोयलांसोबत बैठक, फडणवीसांचीही उपस्थिती

मुंबई सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयलांसोबत शेतकरी नेते रविकांत तुपकरांची (Farmer leader Tupkar meeting with Piyush Goyal) आज 09 डिसेंबरला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीसांनी रविकांत तुपकरांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे. बैठकीसाठी तुपकर बुलडाण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबई : कोविड काळात सर्वाधिक खर्च जंबो केंद्रावर : अनिल गलगली

Twitter : @therajkaran मुंबई कोविडच्या ४१५० कोटींच्या खर्चाची आकडेवारी मुंबई महानगरपालिकेकडून तपशीलवार जाहीर करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली आहे. यात सर्वाधिक खर्च हा जंबो सुविधा केंद्रावर १४६६.१३ कोटी रुपये खर्च करण्यात आला असल्याची नोंद आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (RTI activist […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

“सह्याद्री – द नरेशन ऑफ लाईफ” चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत

Twitter : @Rav2Sachin मुंबई : सामाजिक भान असलेला कलाकार हा निसर्गसारखा नवनिर्मिती करणारा सुप्त स्वभावी आणि तितकाच मूक निरीक्षक हि असतो. त्याचे निसर्गाशी असलेले अतूट नाते त्याच्या निर्मितीची प्रेरणा आहे. मानवी समाजाच्या स्वास्थ्यासाठी पर्यावरण आणि औद्योगिक प्रगती यांची योग्य सांगड घालून निसर्गाशी संवाद साधला तर आपले सर्वांचे जीवन आनंदी होईल. कलाकार हे निसर्ग व रसिक […]

मुंबई

एफडीएकडून पान शॉपवर धडक कारवाई

Twitter : @therajkaran मुंबई :गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील अन्न व औषध विभागाकडून धडक कारवाई सुरु आहे. यातून मोठ्या प्रमाणात सुंगंधित तंबाखुजन्य जप्त करण्यात आले असून त्या त्या ठिकाणच्या पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. एफडीएचे संयुक्त आयुक्त एस. पी. आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त तसेच कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. दोन दिवसात मुंबईतील एकूण ४ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

माझ्यावर गुन्हे दाखल केले, माझ्या आजोबांना अभिमान वाटला असता : आदित्य ठाकरे

Twitter : @NalavadeAnant मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळ नसल्याने मुंबईतल्या डीलाईल रोडच्या रखडलेल्या पुलाचे उद्घाटन शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे युवा नेते आ. आदित्य ठाकरे यांनी केले. यावरून मुंबईतील आणि खास करून दोन्ही शिवसेनेतील वातावरण तापले आहे. या उद्घाटनामुळे सरकारने आदित्य ठाकरे आणि युवा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई भाजपकडून “शंकेखोराचा कोथळा काढण्याचा” कार्यक्रम

Twitter : @NalavadeAnant मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अफजलखानांचा वध करताना वापरलेल्या वाघ नखांच्याबाबत शंका घेणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून मुंबई भाजपाच्या वतीने ‘शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच – वाघ नखांच्या निमित्ताने’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.  […]

मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघासाठी भाजप ॲक्शन मोडवर

Twitter : @NalavadeAnant मुंबई भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी महाविजय मिशन ४५ प्लस हाती घेतले असून याची जोरदार तयारी सुरु करण्याच्या दृष्टीने मुंबईतही पक्षाच्या विविध पातळीवर काम सुरू आहे. याचा आढावा आज झालेल्या कोअर कमिटी बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक रचना, बदललेली राजकीय स्थितीबाबत या बैठकीत चर्चाही करण्यात आली. तसेच आगामी काळातील कार्यक्रमांचे नियोजनही […]

मुंबई

भाजपकडून गोविंदांना १० लाखाचे विमा कवच

Twitter : @NalavadeAnant मुंबईमहायुती सरकारच्या काळात दणक्यात हिंदू सण साजरे होत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई भाजपातर्फे ४०० हून अधिक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील जांबोरी मैदानातून परिवर्तनाची दहीहंडी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. त्याचबरोबर मुंबई भाजपाकडून ४५० मंडळांच्या २५ हजार गोविंदांना १० लाखाचे विमा कवच देण्यात आले आहे. मुंबईतील भाजप नेते […]