Twitter : @NalavadeAnant
मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळ नसल्याने मुंबईतल्या डीलाईल रोडच्या रखडलेल्या पुलाचे उद्घाटन शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे युवा नेते आ. आदित्य ठाकरे यांनी केले. यावरून मुंबईतील आणि खास करून दोन्ही शिवसेनेतील वातावरण तापले आहे. या उद्घाटनामुळे सरकारने आदित्य ठाकरे आणि युवा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल होताच आदित्य ठाकरे यांनी त्याचे स्वागत केले आणि म्हणाले की आज माझे आजोबा (बाळासाहेब ठाकरे) असते तर त्यांना आनंदच झाला असता, अभिमान वाटला असता. मुंबईकरांसाठी लढत राहू, असेही आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी स्पष्ट केले.
डीलाईल रोडच्या पुलाच्या उद्घाटन मुद्द्यावरून राजकरण तापत असून उध्दव ठाकरे कुटुंबियांकडून फक्त सुडाचे राजकारण खेळले जात असल्याचा आरोप शिंदे सेनेकडून केला जात आहे. त्याचे पडसाद सर्वसामान्य मराठी कुटुंबियांवर पडेल की काय? अशी दाट शंका येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेना गटाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी शनिवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केला.
त्याचे झाले काय काय की, मुंबईतला लोअर परेल इथल्या उभारलेल्या नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते. ते तसे मनपा आयुक्त यांनीही घोषित केले होते. पण अचानकपणे आज सेना नेते आदित्य ठाकरे यांनी या पुलाचे उद्घाटन केले. पण खरे तर हा रेल्वे उड्डाणपूल असल्याने याची चाचणी रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित असताना वेस्टर्न रेल्वेने ते अचानकपणे मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) इंजिनियरिंग अधिकाऱ्यांवर ढकलले. त्यामूळे मग नेमके उद्घाटन करायचे कोणी या संभ्रमात सरकार असताना आज आदित्य ठाकरे यांनी या पुलाचे उद्घाटन करून एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच थेट निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना उबाठा नेते, युवासेना अध्यक्ष, आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत डिलाईल रोडचा लोअर परळ पुलाच्या राजकारणावरून शिंदे सरकारवर सडकून टीका केलीय. पुलाचे बेकायदेशीपणे उद्घाटन केल्याचा आरोप केला जात आहे. पालिका प्रशासनने दबावान एफआयआर दाखल केला आहे.
आदित्य म्हणाले, माझ्यावर आणि सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. लोकांसाठी आम्ही लढतोय म्हणून गुन्हे दाखल केले. लेनच काम झालं असताना या सरकारला वेळ नाही म्हणून उदघाटन करत नाहीत. माझ्यावर गुन्हे दाखल केले, माझ्या आजोबांना अभिमान वाटला असता, लोकांसाठी गुन्हे घेतले. आमचं म्हणणं आहे दोन्ही पालकमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा. येथील आयुक्तांना बाहेर जायचं आहे प्रमोशन घेऊन. त्यांच्यावर अनेक आरोप आहेत तरी त्यांची चौकशी का करत नाही ? अशी विचारनाही त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केली.
रस्ते, स्ट्रीट फर्निश्चर असे अनेक घोटाळे यांनी केलेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे सोडून आमच्यावर गुन्हे दाखल करतात. ३१ डिसेंबरनंतर बेकायदेशीर मुख्यमंत्री जातील, त्यांना राज्यपालांनी समज द्यावी. नवी मुंबई मेट्रोवर आम्ही आवाज उठवला तेव्हा ती सुरु केली, याकडेही त्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.
पालिका कर्मचाऱ्यांना आम्ही बोलल्यावर बोनस दिला. समृद्धी वरून मुख्यमंत्री आणि सरकारवर गुन्हा दाखल करा. एक वेळ सांगत होते भाजप लाल दिवे नको. मग आता व्हिआयपीसाठी लोकांना का त्रास देता? माझ्यावर दबावाखाली गुन्हा दाखल केला गेलाय. त्यामुळे आता एकच सांगतो २०२४ साली विधानसभेवर आमचाच भगवा फडकेल आणि ज्यावेळी आम्ही सत्तेत आलो एक मात्र खरं की, भ्रष्टाचार करणाऱ्यांना आम्ही जेलमध्ये टाकणार म्हणजे टाकणारच. मात्र मुंबई मनपात आम्ही घोटाळे केलेत असे तुम्ही रोज बोंबलताना, मग मुंबईकरांसाठी आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही तयार आहोत, असे खुले आव्हानच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
आता हे सरकार बाद होणारच. संविधानाने निकाल दिले तर सरकार पडेल. परंतू समजा राजकारणाने काही दगा केलाच तर मात्र त्यांचाच बाजूने निकाल लागेल. मग असे झाले तर सत्ताधीशांनी तिथं बसून चांगली तरी कामं करावी. मात्र एक त्यांनी लक्षात ठेवावे की, आम्ही लेचेपेचे नाही…वेळ आल्यास आमच्यावर मुंबई आणि महाराष्ट्रसाठी लढताना गुन्हे दाखल झाले तर आम्हाला अभिमानच आहे, असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.