ताज्या बातम्या मुंबई

क्षयरोग आणि कुष्ठरोग संयुक्त शोध अभियान

मुंबई महानगरपालिका करणार १० लाख ८८ हजार घरांमधील नागरिकांची तपासणी

Twitter : @therajkaran

मुंबई :

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात क्षयरोग दूरीकरणाचे (Tuberculosis elimination) तसेच कुष्ठरोग निर्मूलनाचे (irrdadication of leprocy tuberculosis) उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते साध्य करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात २० नोव्हेंबर २०२३ ते ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत सक्रिय संयुक्त क्षयरोग शोध मोहीम आणि कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान १० लाख ८८ हजार घरांमधील अंदाजित ४९ लाख लोकांची तपासणी करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. यात आजारांच्या जनजागृतीसाठी घरोघरी आरोग्य तपासणी करुन क्षयरोग व कुष्ठरोगाच्या नवीन रुग्णांची शोध मोहीम राबविली जाणार आहे.

दरम्यान, या तपासणी मोहिमेत एक महिला आरोग्य स्वयंसेविका आणि एक स्वयंसेवक यांचा एक चमू अशा ३ हजार ११७ चमूंद्वारे तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान नव्याने आढळणाऱ्या कुष्ठ व क्षयरुग्णांची नोंदणी केली जाईल. तसेच या रुग्णांना महानगरपालिकेचे नजिकचे आरोग्य केंद्र, दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येईल. त्यानंतर पुढील आरोग्य तपासणी आणि उपचार विनामूल्य दिले जातील. मुंबईतील सर्व २४ विभागांमधील २८ वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये कार्यरत ४२ यंत्रांद्वारे क्षयरुग्णांकरीता विविध निदान सेवा पुरविण्यात येत आहेत.

मुंबईतील क्षयरुग्णांना सेवा देण्याकरीता २११ आरोग्य केंद्रे आणि १८६ महानगरपालिका दवाखाने, १६ सर्वसाधारण रुग्णालये, ५ वैद्यकीय महाविद्यालये आणि २०० आपला दवाखाना मुंबईत कार्यरत आहेत. बहुआयामी प्रतिरोध (मल्टी ड्रग रेझिस्टंट) क्षयरोग रुग्णांसाठी संपूर्ण मुंबईत २७ डीआर टीबी उपचार केंद्रे कार्यरत आहेत. त्यातील ७ डीआर टीबी उपचार केंद्रे ही खासगी आहेत. सर्व क्षयरुग्णांना पौष्टिक आहार सहाय्यासाठी उपचारा दरम्यान रुपये ५०० दरमहा त्यांच्या बँक खात्यात केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत जमा केले जातात, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.

या  कालावधीत घरोघरी आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले असून लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता रुग्णांनी महानगरपालिका तसेच शासकीय रुग्णालयात लवकरात लवकर संपर्क साधावा व उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. तर कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी या मोहिमेत प्राथमिक तपासणी दरम्यान आढळलेल्या क्षयरोग व कुष्ठरोग संशयितांची तपासणी जवळच्या महानगरपालिकेच्या दवाखान्यात केली जाईल, अशी माहिती दिली. तसेच क्षयरोगासाठी थुंकीची तपासणी आणि एक्सरे तपासणी मोफत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

क्षयरोगाची लक्षणे
१४ दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला, सायंकाळी ताप येणे, लक्षणीय वजन कमी होणे, कफात रक्त येणे, छातीत दुखणे, मानेवर सूज येणे
कुष्ठरोगाची लक्षणे
रुग्णांच्या त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा/चट्टे येणे, जाड बधीर तेलकट चकाकणारी त्वचा कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, तसेच तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा व जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे, इत्यादी लक्षणे आढळून येतात.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज