ताज्या बातम्या महाराष्ट्र

जम्मू काश्मीरच्या जनतेने भाजपच्या विद्वेषी व विभाजवादी राजकारणाला हद्दपार केले : नाना पटोले 

X : @therajkaran मुंबई: जम्मू – काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेस (Congress) व नॅशनल कॉन्फरन्स (National Conference) आघाडीने बहुमत मिळवले आहे. जम्मू व काश्मीर या दोन्ही भागात इंडिया आघाडीने (INDIA alliance) मोठा विजय मिळवला आहे. छोटे पक्ष व अपक्ष यांच्या मदतीने मतविभाजनाचा भाजपचा डाव हाणून पाडत जनतेने भाजपला हद्दपार केले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंची काँग्रेसपुढे लाचारी – संजय निरुपम

X : @NalawadeAnant मुंबई – हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हयात असताना राष्ट्रीय नेते चर्चेसाठी मातोश्रीची पायरी चढायचे हे देशाने पाहिले. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सत्तेच्या लालसेपोटी लाचारी पत्करुन दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांडपुढे (Congress High Command) लोटांगण घालत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी मंगळवारी येथे एका पत्रकार […]

nana patole ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

पदवीधर व शिक्षक निवडणुका एकत्रित लढवल्यास चांगले यश – काँग्रेस

X : @NalawadeAnant मुंबई – मुंबई, कोकण व शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) प्रमूख उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही उमेदवार उतरवल्याने कोकण व नाशिक येथे काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेत उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जाहीर आवाहनच केले. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

आता लक्ष्य विधानसभा : काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला

X : @NalavadeAnant मुंबई लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha election result) काँग्रेस पक्षाने १७ जागा लढवून सर्वांच्या एकजुटीने १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला, हे कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे यश आहे, त्यामुळे एकजुटीची ही वज्रमुठ अशीच कायम ठेवणे गरजेचे आहे. लोकसभेची लढाई आपण जिंकली आहे, आता विधानसभा हे आपले लक्ष्य असून असाच लढा देऊ व विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोकण पदवीधर मतदारसंघ काँग्रेस लढविणार…..!

X: @therajkaran मुंबई: येत्या जून महिन्यात होऊ घातलेली कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस पक्ष लढवेल, असे परस्पर जाहीर करत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकप्रकारे लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची सांगली जागा परस्पर जाहीर केल्याचा बदला घेतला असे मानले जात आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ २०१८ मध्ये एकत्रित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्याने त्यांनी […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील 8 जागांसाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावणार, कुठे आहे मतदान, काय तयारी?

मुंबई- महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघांसह देशातील 89 जागांसाठी शुक्रवारी 26 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. आज संध्याकाळी पाच वाजता या टप्प्यातील मतदारसंघातील जाहीर प्रचार थंडावणार आहे. अखेरच्या दिवशी प्रचारासाठी अमित शाहा हे अमरावतीत येत असून, राहुल गांधी हे सोलापूर आणि अमरावतीत प्रचार करणार आहेत. राज्यात कोणत्या आठ मतदारसंघांत शुक्रवारी मतदान होणार आहे हेही जाणून घेऊयात. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘कोण कोणाचा एजंट हे जनतेला माहितीये’; वारंवार होणाऱ्या आरोपांवर नाना पटोलेंचा प्रकाश आंबेडकरांवर पलटवार

मुंबई : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नाना पटोले हे भाजपचे एजंट आहे, अनेक महत्त्वाच्या जागांवर त्यांनी कमकुवत उमेदवार दिल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोलेंवर केला होता. त्यानंतर आता नाना पटोलेंनी प्रकाश आंबेडकरांवर पलटवार केला आहे. आज नाना पटोले अकोल्यात होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नरेंद्र मोदी कधी बोलणार? राहुल गांधींचा भंडाऱ्याच्या सभेत सवाल

भंडारा- देशात सुरु असलेल्या लोकसभेच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्मावर बोलतात मात्र देशातील मुख्य समस्यांवर मात्र ते मौन बाळगून आहेत, अशी टीका राहुल गांधी यांना भंडाऱ्यात केलेली आहे. चांदूरवाफामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा पार पडली, त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. काही निवडक उद्योगपतींसाठी नरेंद्र मोदी यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

काँग्रेसमधील बंडोबा 24 तासांत झाले थंडोबा, सांगली आणि मुंबईतील नाराज नेत्यांचे सूर नरमले

मुंबई- मविआच्या जागावाटपावर नाराज झालेल्या सांगली आणि मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांनी नाराजीची आणि बंडाची भाषा सुरु केली होती. मात्र दिल्लीतून काँग्रेसच्या वरिष्ठांनी या नेत्यांचे कान पिळल्यानंतर नेत्यांच्या तोंडची बंडाची भाषा बदलल्याचं दिसतंय. सांगलीत काय घडलं सांगलीत चंद्रहार पाटील हेच मविआचे उमेदवार असतील हे जाहीर झाल्यानंतर, तिकिटासाठी आग्रही असलेले आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपाचे स्लीपर सेल’ वंचित बहुजन आघाडी काय करेतय आरोप?, किती आहे तथ्य?

मुंबई- अकोल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं संताप व्यक्त केलाय. काँग्रेसचा उमेगवार हा संघ विचारांचा असल्याचा प्रचार सध्या अकोल्यात करण्यात येतोय. चार वेळा या मतदारसंघातून निवडून आलेल्या संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रेंना भाजपानं तिकिट दिलंय. तर वंचितचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून रिंगणात आहेत. […]