ताज्या बातम्या राष्ट्रीय

पंतप्रधानांचे बौद्धिक, सत्तेनंतर 100 दिवसांचा कृती आराखडा; तिसऱ्यांदा जिंकण्यावर भाजप ठाम!

नवी दिल्ली : काल रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या कार्यकाळातील शेवटची बैठक झाली. भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार यावर पंतप्रधान मोदींचा ठाम विश्वास असून सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांतील कृती आराखड्यावर मंत्रीपरिषदेत चर्चा झाली. याशिवाय पुढील पाच वर्षांच्या तपशीलवर कृती आराखडा आणि विकसित भारत : २०४७ या व्हिजन डॉक्युमेंटवर चर्चा करण्यात आली. याशिवाय विजयानंतर […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भाजपच्या 155 उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता, लोकसभेसाठी कोण कोणत्या मतदारसंघातून लढणार?

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, रक्षामंत्री राजनाथ सिंहसह तब्बल १५५ जणांच्या नावाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसी, अमित शाहांना गांधीनगर, राजनाथ सिंहना लखनऊ, स्मृती इराणी अमेठी, धर्मेंद्र प्रधान यांना ओडिसातील संबलपूर, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘पंतप्रधानच म्हणाले होते शरद पवार माझे राजकीय गुरू’, मोदींच्या यवतमाळ दौऱ्यानंतर राऊतांचा पलटवार

मुंबई : शरद पवार हे सर्वोत्कृष्ट कृषीमंत्री होते, असं पंतप्रधान मोदीच अनेक वेळा म्हणाले आहेत. मोदींनी अनेकदा शरद पवार माझे राजकीय गुरू असल्याचंही विधान केलं आहे. त्यामुळे मोदी आता खोटं बोलत आहेत, अशा शब्दात संजय राऊतांनी मोदींच्या कालच्या यवतमाळ दौऱ्यानंतर हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची काल यवतमाळमध्ये सभा झाली होती. यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘गरीबांचा पूर्ण पैसा गरीबांना, हीच मोदींची गॅरेंटी’; यवतमाळमध्ये पंतप्रधानांची शरद पवारांसह काँग्रेसवरही टीका

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नमो शेतकरी महासन्मान योजना, मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान, पंतप्रधान कृषी सिंचन योजना यासह अनेक योजनांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना मदत देण्यात आली. यावेळी जनतेशी संवाद साधताना मोदींनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. विदर्भ आणि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी, पंडालवरच 13 कोटींचा खर्च’; विरोधकांचा हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीही यवतमाळला रवाना झाले आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. यवतमाळच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेकांना बसमध्ये जबरदस्तीने भरून सभेला घेऊन गेले. विदर्भ मराठवाड्यातील बस मोदींच्या सभेसाठी वापरल्याने जनतेचे हाल […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

Rajya Sabha : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर, महाराष्ट्र मात्र प्रतीक्षेतच!

नवी दिल्ली भाजपने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. १५ राज्यांतील ५६ राज्यसभा जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे. दरम्यान भाजपकडून बिहार, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम बंगाल राज्यातील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जागांसाठी अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत 2 दिवस पोलीस कोठडीत, मोदींच्या पोस्टरवर काळं फासल्याचा आरोप

नागपूर युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरला काळं फासल्या प्रकरणी राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरवर काळ फासल्याप्रकरणी रविवारी नागपूर पोलिसांनी राऊतांना अटक केली होती. आज सोमवारी सत्र न्यायालयाने कुणाल राऊतांना दिलासा न देता दोन […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये पंतप्रधान मोदींचं ‘अबँडन्स इन मिलेट्स’ अपयशी, झाकीर हुसेनच्या ‘पश्तो’चा गौरव

नवी दिल्ली जगभरातील कलावंत म्युझिक इंडस्ट्रीशी संबंधित या खास ग्रॅमी अवॉर्ड्सची आतुरतेने वाट पाहत असतात. ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये 94 विविध श्रेणीतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हॉलिवूडचे अनेक गायक आणि संगीतकारांना यात यश मिळालं असून भारतातील चार रत्नांनी देशाचा गौरव केला आहे. या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘अबँडन्स इन मिलेट्स’ […]

मुंबई ताज्या बातम्या राष्ट्रीय

मोठी बातमी! लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न जाहीर, मोदींनी भेट घेऊन दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली भारताच्या राजकारणातले महत्वाचे राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आडवाणींनी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. अयोध्येतील रामजन्मभूमी आंदोलनाचं मोठं श्रेय लालकृष्ण आडवाणींना जातं. आडवाणींनी १९९० मध्ये गुजरातमधील सोमनाथ ते उत्तर प्रदेशातील अयोध्येपर्यंत रथयात्रा सुरू केली होती. 9 जून […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

राहुल गांधींना गुवाहाटीतील शहरात जाण्यास मज्जाव; काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडले

शिलाँग राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी गुवाहाटी येथे पोहोचली. यावर काँग्रेसला रोखण्यासाठी पोलिसांनी रस्ता अडवला होता. यानंतर संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, अशी वागणूक आसामी संस्कृतीचा भाग नाही. याप्रकरणात राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची सूचना आसाम पोलिसांच्या डीजीपींना […]