ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

‘काँग्रेस जनतेची संपत्ती घुसखोरांना वाटेल, मंगळसूत्र घेतली जातील’, पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर टीकेची झोड

नवी दिल्ली- देशात काँग्रेसचं सरकार आलं तर संपत्तीचं फेरवाटप करण्यात येईल, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील बंसवारा येथील प्रचारसभेत केलं. काँग्रेस सत्तेत आली तर जनतेच्या संपत्तीचं मूल्यमापन करण्यात येईल आणि ती संपत्ती घुसखोर आणि ज्यांना जास्त मुलं आहेत, त्यांच्यात वाटून देण्यात येईल, असं प्तप्रधान मोदी म्हणालेत. महिलांची मंगळसूत्रं हिसकावून घेतली जातील, अशी भीतीही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा 29 पटींनी वाढला भाजपा? अवघ्या 5 महिन्यांत 10 कोटींहून अधिक सदस्य, 21 राज्यांत सरकार

नवी दिल्ली- 2014 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा मुंबईच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सभेत करण्यात आली. त्यानंतर गेल्या 10 वर्षांत भाजपाचा विस्तार प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला आहे. 2014 नंतर भाजपानं सत्तेत आल्यानंतर सर्वसमावेशक भूमिका घेत, पार्टी विथ डिफरन्स या मूल्याला बाजूला ठेवत पक्षाचा विस्तार केला. देशातील सर्व प्रांतात, सर्व जाती-धर्मांत भाजपाचा झालेला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

फडणवीसांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न, मोदी-शाहांनी फडणवीसांचे पंख छाटलेत, राऊतांचा काय दावा?

मुंबई- उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या गौप्यस्फोटाचे तीव्र पडसाद राजकारणात उमटताना दिसतायेत. भाजपाकडून या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंवर टीकेचा भडीमार सुरु असताना आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस यांचं पंतप्रधान होण्याचं मोठं स्वप्न आहे, त्यातूनच त्यांनी हे विधान केल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. काय म्हणालेत संजय राऊत? […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

पहिल्या टप्प्यातील 102 जागांपैकी किती जागा एनडीए आणि इंडिया आघाडीला ? महाराष्ट्रात पाच पैकी कुणाला किती?

नवी दिल्ली- निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळपासून सुरुवात झालेली आहे. विदर्भात तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस असल्यानं मतदानाचा जोर सकाळच्या सत्रात कमी असल्याचं पाहायला मिळालंय. हाच ट्रेंड दिवसभर राहिला तर मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान देशात 102 जागांसाठी आज मतदान होत असून, या जागांच्या निकालांवर पुढची दिशा स्पष्ट होईल, असं मानण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

भाजपाला निवडणुकीत किती जागा मिळतील?, राहुल गांधींनी व्यक्त केला अंदाज, इंडिया आघाडीबाबत काय म्हणाले?

गाझियाबाद – देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या वतीनं 400 पारचा नारा देण्यात आलाय. महाराष्ट्रासह देशभरात हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भाजपा आणि एनडीएचे नेते कार्यरत असल्याचं दिसतं आहे. भाजपानं हा 400 पारचा नेरेटिव्ह सेट केलेला असताना, आता काँग्रेससह इंडिया आघाडीचे नेते इंडिया आघाडीला बहुमत मिळेल, असा दावा करताना दिसू लागले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मर्यादापुरुषोत्तमाच्या अस्तित्वालाच नाकारण्याचं काम काही पक्षांचं’, राज ठाकरेंचे रामनवमीच्या शुभेच्छांतून टोले

मुंबई – अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतरची आलेली रामनवमी विशएष महत्त्वाची मानण्यात येतेय. लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत आलेल्या या रामनवमीचा वापर बरेच पक्ष राजकारणासाठी साधून घेताना दिसतायेत. राम मंदिराच्या निर्माणावरुन श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपाकडून आणि महायुतीकडून प्रचारात होताना दिसतोय. त्यातच महायुतीत नुकतेच सहभागी झालेल्या राज ठाकरे यांनीही रामनवमीच्या शुभेच्छा देशातल्या जनतेला दिल्या आहेत. रामनवमीच्या शुभेच्छातूनही विरोधकांवर प्रहार […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मोदींची हवा नाही, वादग्रस्त वक्तव्यानं नवनीत राणा अडचणीत, राणा दाम्पत्य थेट अडसुळांच्या घरी

अमरावती- जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टानं वैध ठरवल्यानं उमेदवारीचा मार्ग मोकळा झालेल्या नवनीत राणा पुन्हा चर्चेत आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापूर्वीच त्यांना भाजपानं तिकीट जाहीर केलं आणि त्यांनी पक्षप्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी राणा यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला. सुप्रीम कोर्टातही जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा लढा त्यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पहिल्या टप्प्यात राज्यातल्या कोणत्या पाच मतदारसंघांमध्ये मतदान?, कोण आहेत आमनेसामने?

नागपूर- होणार होणार, अशी चर्चा आणि अत्सुकता असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून रणरणत्या उन्हात सुरु असलेला पहिला टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी संपतोय. पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. कोणत्या पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राणे दादा की किरण भैय्या; सिंधुदुर्ग – रत्नागिरीत पेच कायम

X: @ajaaysaroj मुंबई: सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पेच अजूनही कायमच आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण दादा राणे की राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण भैय्या यावर महायुतीचे घोडे अडले आहे. काही दिवसांपूर्वीच उद्विग्न मनःस्थितीत किरण सामंत यांनी, नरेंद्र मोदींना पंतप्रधान (PM Narendra Modi) करण्यासाठी, एन डी ए चा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये 600 कोटींचा गैरव्यवहार’, संजय राऊत यांचं थेट पंतप्रधानांना पत्र, काय आहे प्रकरण?

मुंबई- लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून होताना दिसतोय. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने असलेल्या फाऊंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकतडे करण्यात आलेली आहे. याबाबतचं पत्र संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवण्यात आलेलं आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून […]