नवी दिल्ली- निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळपासून सुरुवात झालेली आहे. विदर्भात तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस असल्यानं मतदानाचा जोर सकाळच्या सत्रात कमी असल्याचं पाहायला मिळालंय. हाच ट्रेंड दिवसभर राहिला तर मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान देशात 102 जागांसाठी आज मतदान होत असून, या जागांच्या निकालांवर पुढची दिशा स्पष्ट होईल, असं मानण्यात येतंय. 2019 साली या 102 जागांपैकी 40 जागा भाजपानं, 24 जागा डीएमकेनं तर 15 जागा काँग्रेसनं मिळवल्या होत्या इतरांना 23 जागा मिळाल्या होत्या.
यावेळी या 102 जागांवर काय होणार?
दिव्य मराठी वेबसाईटच्या एका वृत्तानुसार, पहिल्या टप्प्य़ात 102 जागांपैकी 40 ते 45 जागा या एनडीएला मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला 42 ते 47 जागा मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील जागांत इंडिया आघाडीची सरशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
- तामिळनाडू- एकूण जागा-39
मतदान – 39 जागांवर
संभाव्य निकाल
डीएमके-काँग्रेस- 32 ते 37 जागा
एआयडीएमके आघाडी- 0 ते 3 जागा
भाजपा – 0 ते 2 जागा - राजस्थान- एकूण जागा-25
पहिल्या टप्प्यात मतदान – 12
संभाव्य निकाल
भाजपा – 05
काँग्रेस- 01
इतर -01
चुरशीची स्पर्धा-05 - उत्त्रर प्रदेश– एकूण जागा-80
पहिल्या टप्प्यात मतदान – 08
संभाव्य निकाल
भाजपा – 04
काँग्रेस आघाडी- 04 - मध्य प्रदेश– एकूण जागा-29
पहिल्या टप्प्यात मतदान – 06
संभाव्य निकाल
भाजपा – 04
काँग्रेस- 02 - महाराष्ट्र– एकूण जागा-48
पहिल्या टप्प्यात मतदान – 05
संभाव्य निकाल
भाजपा – 04
काँग्रेस- 01 - उत्तराखंड-एकूण जागा 05
पहिल्या टप्प्यात मतदान – 05
संभाव्य निकाल
भाजपा – 05
काँग्रेस- 00 - बिहार – एकूण जागा 40
पहिल्या टप्प्यात मतदान – 04
संभाव्य निकाल
भाजपा आघाडी- 04
काँग्रेस- 00
8.प. बंगाल- एकूण जागा-42
पहिल्या टप्प्यात मतदान – 03
संभाव्य निकाल
भाजपा आघाडी- 03
तृणमूल काँग्रेस- 00
- ईशान्य भारत -एकूण जागा- 25
पहिल्या टप्प्यात मतदान – 15
संभाव्य निकाल
भाजपा आघाडी – 11
काँग्रेस आघाडी- 02
इतर -02 - जम्मू आणि काश्मीर -एकूण जागा-05
पहिल्या टप्प्यात मतदान – 01
संभाव्य निकाल
भाजपा – 01
काँग्रेस- 00