मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र शोध बातमी

Impact : भुजबळ भाजपच्या वाटेवर? ‘द राजकारण’नंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा दावा

मुंबई ‘द राजकारण’ ने काल १ फेब्रुवारी रोजी छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याला दुजोरा देणारं ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे. त्यामुळे छगन भुजबळ पुढील लोकसभा निवडणूक भाजपमधून लढवणार असल्याच्या राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. मंत्री छगन भुजबळ हे अजित पवार गटात अस्वस्थ असल्याचं सांगितलं जात आहे. मराठा […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

न्यायालयाच्या आदेशाच्या 12 तासात व्यासजींच्या तळघरात पूजा, सर्वसामान्य भाविकांनीही घेतलं दर्शन

वाराणसी ज्ञानवापी येथील व्यासजींच्या तळघरात पूजा केल्यानंतर सर्वसामान्य भाविकांनी पोलिसांच्या उपस्थितीत दर्शन घेतलं. वाराणसीच्या ज्ञानवापी परिसरात तब्बल 31 वर्षानंतर व्यासजींच्या तळघरात पूजा करण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीशाच्या आदेशानंतर काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टने गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्याकडून ही पूजा करुन घेतली. गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी मध्यरात्रीच्या सुमारास व्यासजींच्या तळघरात पूजा-अर्चा केली. कोर्टाने याबाबत आदेश देताना ७ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

‘निर्मला सीतारमण यांचा वैचारिक गोंधळ उडालाय, गेल्या 10 वर्षात देशात 7 IIT, 7 IIM कधी उघडले?’ महिला नेत्याचा सवाल

मुंबई X : @MeenalGangurde8 अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी गेल्या १० वर्षात भाजप सरकारच्या योजनांबद्दल अपडेट दिली. आयकर स्लॅब व्यतिरिक्त इतर कोणत्या क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. यावर आता एक महिला नेत्याने निर्मला सीतारमण यांना सवाल उपस्थित केला आहे. अर्थसंकल्पावेळी सीतारमण म्हणाल्या, की सरकारने गेल्या १० वर्षात देशात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप? चर्चेत असलेले भुजबळ नवा राजकीय बॉम्ब टाकणार!

मुंबईX : @MeenalGangurde8 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठे फेरबदल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. मात्र लोकसभा निवडणूक आणि पक्षांतर्गत अस्वस्थतेमुळे काही उमेदवार दुसऱ्या पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात, असेही आडाखे बांधले जात आहे. यात छगन भुजबळांबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. मंत्री छगन भुजबळ हे अजित पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

‘अंतरिम नव्हे, मोदी सरकारचा अंतिम अर्थसंकल्प’; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

मुंबई आज मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारने केलेली कामं आणि येत्या काळातील प्लान जाहीर केले. आयकर स्लॅब व्यतिरिक्त इतर कोणत्या क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. यावर विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. ‘देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

‘शेतकरी, ग्रामीण विभाग व बेरोजगार तरुणांची घोर उपेक्षा करणारा अर्थसंकल्प’; किसान सभेची टीका

मुंबई आज मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारने केलेली कामं आणि येत्या काळातील प्लान जाहीर केले. आयकर स्लॅब व्यतिरिक्त इतर कोणत्या क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. मोदी सरकारच्या या अंतरिम अर्थसंकल्पावर किसान सभेकडून टीका करण्यात आली आहे. कृषी क्षेत्राचा विकासदर 4% वरून घसरून 1.8% पर्यंत खाली […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय विश्लेषण

‘आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही’, अर्थमंत्र्यांच्या अंतरिम अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या वर्षी निवडणुका असल्याने अंतरिम अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात येत नाहीत. मात्र करदात्यांसाठी मोदी सरकारने चांगली बातमी दिली आहे. वर्षिक ७ लाख उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

रत्नागिरीत ठाकरे गटाला आणखी एक धक्का, शिवसेनेचा खंदा नेता भाजपमध्ये घेणार प्रवेश

रत्नागिरी उद्धव ठाकरे यांना कोकण दौऱ्याआधीच मोठा धक्का बसला आहे. तब्बल २५ वर्षे आमदार असलेले सूर्यकांत दळवी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सूर्यकांत दळवी १९९० ते २०१४ पर्यंत सलग २५ वर्षे दापोली मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षातील लोकांनी गद्दारी करून पाडल्याचा आरोप सूर्यकांत […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

थोड्याच वेळात अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार, यंदाच्या बजेटमध्ये काय असेल खास?

नवी दिल्ली आज १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२४०२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहे. येत्या काही मिनिटात हा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आहे. या वर्षी सार्वत्रिक निवडणूक असल्याने अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर जुलै महिन्यात संपूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

CID व EOW क्लोजर रिपोर्ट तरी राजकीय सूडबुद्धीने रोहित पवारांवर ED ची कारवाई, पक्षाकडून घंटानाद आंदोलनाची घोषणा

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांची उद्या १ फेब्रुवारी रोजी ईडीकडून चौकशी होणार आहे. यापूर्वी ईडीने २४ जानेवारी रोजी रोहित पवारांची चौकशी केली होती. ही चौकशी ही राजकीय सुडापोटी असून कारखाना लिलावाच्या बाबतीत सीआयडी आणि आर्थिक गुन्हे शाखा यांनी क्लोजर रिपोर्ट सादर केलेला असतानाही केवळ राजकीय […]