ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांची आज पुण्यात पत्रकार परिषद, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घोषणांची शक्यता

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुप्रीमो शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते महत्त्वाची घोषणा करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत रवींद्र वायकर यांनी ईडीच्या भीतीने रविवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘धर्माची अफू व ड्रग्जचे विष देऊन तरुणांना उद्ध्वस्त करण्याचे महायुती सरकारचे पाप’ – नाना पटोले

मुंबई पुण्यात तीन दिवसात तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडणे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरातून हजारो टन ड्रग्जचा धंदा होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. मुंद्रा बंदराचा मालक व भाजपाचे ‘आका’ यांचे काय संबंध आहेत, हे जगजाहीर आहे. महायुती सरकार राज्यातील तरुणांना धर्माचा अफू व ड्रग्जचे विष देऊन बरबाद करण्याचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात 2200 कोटींचे ड्रग्ज जप्त, ड्रग माफियांना कुणाचा आशीर्वाद? विरोधकांचा सवाल

पुणे पुणे पोलिसांनी ड्रग्जविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी तीन दिवसांत 4000 कोटी रुपयांचे 2000 किलो एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन ड्रग) जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या विविध पथकांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि दिल्ली येथे अमली पदार्थ विरोधी कारवाया केल्या. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून संताप व्यक्त […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘अर्ध्या तासात 4 वेळा पाठलाग करत घेरलं, काल मृत्यू दारात उभा होता’; भाजपच्या हल्ल्यानंतर निखिल वागळेंनी मांडली भूमिका

पुणे ‘निर्भय बनो’ सभेला जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर काही भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. पुण्यात राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वागळे कार्यक्रमाला आले तेव्हा त्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेकदेखील करण्यात आली. या घटनेचा राज्यभरातून तीव्र संताप […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात भाजपच्या राड्याचा माकपकडून तीव्र निषेध, गृहमंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी

पुणे पुणे येथे ‘निर्भय बनो’ असे जनतेला आवाहन करणाऱ्या सभेला जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी नियोजन करून जीवघेणा हल्ला केला. या फॅसिस्ट हिंस्र हल्ल्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटी तीव्र निषेध करत आहे. भाजपच्या पुण्यातील नेत्यांनी संविधानाचे पालन करण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्राचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘वाहतूक कोंडीत पुण्याचा जगात सातवा क्रमांक, पुण्यात मेट्रोचे ढिसाळ नियोजन’; वडेट्टीवारांचा घणाघात

मुंबई पुणेकर वाहतूक कोंडींने हैराण झाले असून सत्ताधारी लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत आबे. परिणामी पुण्यात वाहतूक कोंडीचा विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसत आहे. तरी पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न तत्काळ सोडवा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पुण्यात मेट्रोचे ढिसाळ नियोजन असून मेट्रो प्रशासनाला वठणीवर आणा असंही ते यावेळी म्हणाले. पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

पुण्यातील कुख्यात गुंड; खून, दरोड्याच्या आरोपीसह मुख्यमंत्र्यांचा फोटो, संजय राऊतांचं ट्विट करत हल्लाबोल

पुणे: मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने शुभेच्छा दिल्याचा फोटो सोमवारी समोर आल्याने खळबळ उडाली होती. आधीच शिंदे गटाच्या शहराध्यक्षावर गोळीबार करणारा गणपत गायकवाड याने एकनाथ शिंदेंवर गुंडशाहीला खतपाणी घातल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर अजित पवार यांची पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असिफ मुहमंद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीची भेट […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘ती अतिशय चुकीची…..’; कुख्यात गुंड गजा मारणे आणि पार्थ पवार यांच्या भेटीवर काय म्हणाले अजित पवार?

पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार आणि कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या भेटीचा व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावर विरोधकांनी टीका केली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली असून मी त्याबद्दल माहिती घेत आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, काही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यातील कुख्यात गुंडांचं राजकीय कनेक्शन कशासाठी? गृहमंत्री फडणवीसांनी स्पष्टीकरणं द्याव, आपची मागणी

पुणे कुख्यात गुंड गजा मारणे याने सपत्नीक अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीमागे नेमकं काय कारण आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र ही भेट वादाच्या भोवऱ्यात मात्र सापडली आहे. आपचे प्रवक्ते मुंकुंद किर्दत यांनी या भेटीवर आक्षेप घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कुख्यात गुंड गजा मारणे सपत्नीक पार्थ पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चा

पुणे पुण्यातील राजकीय वर्तुळात राजकारण्यांबरोबरच गुन्हेगारी क्षेत्राशीसंबंधित व्यक्तींचा प्रभाव पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड गजा मारणे याने सपत्नीक अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीवरुन अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. गजा मारणे याने पत्नीसह पार्थ पवारांची भेट घेतली. त्याची पत्नी जयश्री मारणे माजी नगरसेविका आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात […]