X: @therajkaran
वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेचा (MNS) राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार या चर्चाना काही दिवसापासून उधाण आले होते .मात्र दोन दिवसांत मी सगळं जाहीर करेन, असं ते राजीनामा देताना म्हणाले होते. त्यातच आता वसंत मोरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार(Sharad Pawar )यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आपली भूमिका मांडताना वसंत मोरे यांनी म्हटलं होत की, मला मनसेमधील अनेक नेत्यांचे फोन आले, मात्र मी आता परतीचे दोर कापले आहेत. मला खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आणि मित्र म्हणून भाजपचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांचा देखील फोन आला. तुम्ही सक्षम आहात, योग्य तो निर्णय घ्या, असे संजय राऊत यांनी आपल्याला म्हटल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. मी कोणाला फॉलो करायचं? हे नक्की सांगेन, असेही त्यांनी यावेळी म्हटले. मात्र आज त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने ते नेमकी काय भूमिका घेणार? कोणता झेंडा हाती घेणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर विविध पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. कॉंग्रेसचे माजी आमदार मोहन जोशींनी (Congress leader Mohan Joshi) भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे कडून वसंत मोरेंना अजित पवार गटात येण्यासाठी खुली ऑफर देण्यात आली. माझी ऑफर मी त्यांना दिली आहे. अजित पवार आणि मोरे यांचा थेट संपर्क आहे, असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या होत्या. या सगळ्यांच्या ऑफरवर बोलताना वसंत मोरे म्हणाले होते की, मी अजून राजीनामा दिल्याच्या प्रसंगातून सावरलेलो
नाही. मला कार्यकर्त्यांशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्याशी चर्चादेखील करायची आहे. सगळ्यांशी चर्चा करुन मी निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले होते. मात्र आता ते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे. शरद पवार गटासोबत मोरे पुढची वाटचाल करणार का? की अजून काही वेगळा निर्णय घेणार?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.