ताज्या बातम्या महाराष्ट्र

NCP split : शरद पवारांचा फोटो, नाव वापरू नका : सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारले! 

X: @therajkaran

शिवसेनेप्रमाणेच (Shiv Sena) राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) दोन गटांमध्येही पक्षनाव व पक्षचिन्हावरून कायदेशीर लढाई चालू आहे. यासंदर्भात शरद पवार गटानं (Sharad Pawar Group ) दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये कोर्टाने अजित पवार (Ajit Pawar) यांना खडसावले आहे. शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरण्यास मनाई करत न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. 

अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फुट (Split in NCP) पडली. राष्ट्रवादी कॉँग्रेस विभागली जाऊन अजित पवार गट आणि शरद पवार गट तयार झाले. दरम्यान, निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी हे पक्ष नाव आणि घडयाळ हे चिन्ह अजित पवार गटाला बहाल केले तर शरद पवार गटाला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉँग्रेस हे नाव देत तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल केले. या विरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. अजित पवार गट हा शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरत असल्याचा आरोप करण्यात आला होता. 

कोर्टात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या बाजूने वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी (Abhishek Manu Singhvi) युक्तिवाद करत शरद पवार यांची बाजू मांडली. मोठा युक्तिवाद करत अजित पवार गट शरद पवार यांचे नाव तसेच फोटो वापरत असल्याचा आरोप सिंघवी यांनी करत यावर आक्षेप नोंदवला. याचा पुरावा अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात दिला. त्यानंतर कोर्टाने अजित पवार गटाला फटकारले आहे. सिंघवी म्हणाले, अजित पवार गटाचे हे पोस्टर्स न्यायालयाने पहावे. त्यावर शरद पवारांचे फोटो आणि नाव आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह दिल्यावर अजित पवार गट शरद पवारांचा फोटो कसे वापरू शकतात, असा सवाल करत त्यांना आमचा फोटो वापरण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी सिंघवी यांनी कोर्टापुढे केली. 

सुप्रीम कोर्टाने याची दाखल घेतली असून अजित पावर गटाला चांगलेच फटकारले. शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरता येणार नाही असे म्हणत ते न वापरण्यासंदर्भात लेखी देण्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या बाबत तुमच्या कार्यकर्त्यांना सूचना देण्याचे देखील कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ मार्च रोजी घेतली जाणार आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात