पुणे
कुख्यात गुंड गजा मारणे याने सपत्नीक अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीमागे नेमकं काय कारण आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र ही भेट वादाच्या भोवऱ्यात मात्र सापडली आहे.
आपचे प्रवक्ते मुंकुंद किर्दत यांनी या भेटीवर आक्षेप घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. या सर्वांमुळे पुणेकर सामान्य नागरिक धास्तावले आहेत. अस्वस्थ होतोय. या सर्वांचे राजकीय कनेक्शन कशासाठी आहे हे गृहमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट करावे, असं किर्तद यावेळी म्हणाले. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. यात ते म्हणाले की, पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार मात्र गुंड शरद मोहोळ यांचे बॅनर लावल्यावर टीका करताना दिसले होते.
मात्र आज गुंड गजा मारणे हे राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांना भेटल्याचा बातम्या येत आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे दीपक मानकर हेही होते गजा मारणे यांच्यावर सहा पेक्षा अधिक खुनाचे आरोप आहेत. पुण्यातील गेल्या काही वर्षांमध्ये या मतदारसंघाला गँगवॉरचा, गुंडांचा संसर्ग झालेला आहे. शरद मोहोळ यांच्या खुनानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस त्याला कुविख्यात गुंड म्हणतात, तर निलेश राणे हिंदुत्ववादी संबोधतात, नारायण राणे मात्र तो विद्वान होता का? असा प्रश्न मीडियालाच करतात. भाजपाचे पदाधिकारी त्याच्या कुटुंबीयाची भेट घेत पुढे हिंदुत्वाचे राजकारण करू, निवडून आणू अशी ग्वाही देतात. आता या खुनामागचा सूत्रधार म्हणून अटक झालेला गुंड विठ्ठल शेलार याने २०१७ मध्ये गिरीश बापट, माजी आमदार बाळा भेगडे आदींच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश केला होता व त्याला युवा मोर्चाचा अध्यक्ष पद दिले गेले होते. या सर्वामुळे पुणेकर सामान्य नागरिक धास्तावले आहेत. अस्वस्थ होतोय. या सर्वांचे राजकीय कनेक्शन कशासाठी आहे हे गृहमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट करावे.