ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राऊतांनी शिंदेंचा नवा फोटो केला ट्विट, असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच म्हणत पुन्हा जोरदार टीका

मुंबई संजय राऊत गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुंडांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या गोळीबारामागे राज्यातील गुंडाराज कारणीभूत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. संजय राऊतांनी आज चौथा फोटो शेअर केला आहे, ज्यात मुख्यमंत्री एका गुंडासोबत असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, गृहमंत्री देवेंद्रजी, यालाच म्हणतात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार पक्षांतर्गत गँगवॉरमधून; उद्योगमंत्री उदय सामंत

By अनंत नलावडेX : @NalavadeAnant मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही गंभीर आणि दुर्दैवीच घटना असल्याचे सांगत ठाकरे गटातील अंतर्गत गँगवॉरमुळेच मॉरिस नोरान्हो याने घोसाळकरांची हत्या केल्याचा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा विरोधकांच्या प्रयत्नांचा उदय सामंत यांनी शुक्रवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

संजय राऊतांचा धडाका सुरूच, सलग तिसऱ्या दिवशी शिंदेंचा गुंडांसोबतचा फोटो शेअर

मुंबई संजय राऊतांचा धुमधडाका सुरूच असून आज तिसऱ्या दिवशी सलग त्यांनी फोटोबॉम्ब शेअर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गुंडासोबतचा फोटो ट्विट करीत पुन्हा एकनाथ शिंदेंना घेरण्यात आलं आहे. शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा. ठाणे पुणे परिसरात हत्या, अपहरण, सोन्याचांदीच्या दुकानांवर दरोडे, अशा दाखलेबाज गुन्ह्यात सहभागी असलेल्या या महाशयांचे स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करीत आहेत, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘भाजपला काँग्रेसची भीती वाटते, म्हणून वारंवार नेहरूंचा जप’; मोदींच्या कालच्या भाषणावर राऊतांची फटकेबाजी

मुंबई ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला काँग्रेसची, इंडिया आघाडीची भीती वाटते. म्हणून प्रत्येक भाषणात जवाहरलाल नेहरूंचा जप केला जातो. गेल्या १० वर्षातील मोदींचं एकही भाषण असं नाही ज्यात पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसचा उल्लेख केलेला नसेल. तुम्ही स्वत:बद्दल बोला… वारंवार काँग्रेसबद्दल का बोलता,’ अशा शब्दात संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींच्या राज्यसभेतील भाषणावर टीका केली. पंडित नेहरूंच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्र्यांसोबत हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण? संजय राऊतांचा आणखी एक फोटोबॉम्ब

मुंबई मुख्यमंत्र्यांचे विविध गुंडांसोबतचे फोटो पोस्ट करीत संजय राऊतांकडून मोठा सवाल उपस्थित केला जात आहे. आज राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एक गुंड हातात भगवा घेऊन उभा असल्याचा दावा केला आहे. त्या व्यक्तीवर खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, अपहरण असे गुन्हे असून मोक्कामधून नुकताच तो बाहेर आल्याचं संजय राऊतांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य, मुख्यमंत्री […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही व्यक्ती कोण? शोध घ्या, मग कळेल’; संजय राऊतांचा फोटोबॉम्ब

पुणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गुंड हेमंत दाभेकरने वर्षा निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या गुन्ह्यात साक्षीदार आहे. हेमंत दाभेकर हा जामिनावर असून शरद मोहोळ याच्या अत्यंत जवळचा मानला जातो. दाभेकरने थेट वर्षा बंगल्यावर जाऊन खासदार श्रीकांत शिंदेची भेट घेतल्याने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘महाविकास आघाडीचा सोंगाड्या म्हणजे संजय डाऊट’; शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंची जहरी टीका

मुंबई संजय राऊतांसह ठाकरे गटाचे अनेक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात. ते घटनेविरोधात, बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री पदावर बसल्याचा आरोप राऊतांकडून केला जात आहे. दरम्यान यावर शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी जहरी टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीचा सोंगाड्या आहे, अशा शब्दात ज्योती वाघमारे यांनी टीकास्त्र सोडले. वाघमारे पुढे म्हणाल्या, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

‘अयोध्येत श्रीराम, बिहारात पलटू राम’, मात्र जे होतं ते चांगल्यासाठीच होतं’, नितीश कुमार यांच्या राजीनामा घडामोडीवर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई नितीश कुमार यांनी काल बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत एनडीए सरकारसोबत सत्ता स्थापन केली. या घडामोडीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी यावर विरोध केला आहे. याशिवाय त्यांनी सामनामध्ये ‘अयोध्येत श्रीराम, बिहारात पलटू राम’ अशा शीर्षकाखाली खरमरीत अग्रलेख लिहिला आहे. नितीश कुमार यांनी […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

कोणतीच तपास यंत्रणा स्वतंत्र राहिली नाही…..?

X: @therajkaran ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर आरोप……! मुंबई, दि.२४(अनंत नलावडे)- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांना त्यांच्या बारामती ऍग्रो कंपनीतल्या कथित गैर व्यवहार प्रकरणी ईडी कडून नोटीस बजावल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी बुधवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना तीव्र संताप व्यक्त करत,’ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडून संजय राऊत यांना शूर्पणखेची उपमा

मुंबई ज्यांनी प्रभू रामचंद्रांचा अवमान करून हिंदुत्ववादी भूमिका गुंडाळून ठेवली ते आज राम कोण? आणि रावण कोण? हे सांगत आहेत. संजय राऊत यांची भूमिका तर रामायणातील कपटी शूर्पणखेप्रमाणेच राहिली आहे, असं म्हणज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राऊतांवर जहरी टीका केली. येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या अहंकाराचं नाक कापल्याशिवाय राहणार नाही, असंही पुढे ते म्हणाले. भाजपचे […]