ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘वाजवा तुतारी, गाडा गद्दारी..!’ नव्या पक्षचिन्हाबाबत कशी आहे नेत्यांची भावना?

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘तुतारी’ हे पक्षचिन्ह दिलं आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ हे नाव दिलं होतं. त्यावेळी पक्षचिन्ह देण्यात आलं नव्हतं. शरद पवार गटाकडून वटवृक्ष या चिन्हाचा पर्याय देण्यात आला होता. मात्र काल २२ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी […]

महाराष्ट्र

मविआच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय २७ फेब्रुवारीला !

X : @NalavadeAnant मुंबई: लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्रीतपणे सामोरे जाणार असून जागा वाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत (MVA) कोणतेही मतभेद नसून काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीतच जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, असे स्पष्टीकरण पक्षाचे राज्य प्रभारी रमेश […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘महानंद आता गुजरातला विकले आहे, जय हो, महानंद की’; जितेंद्र आव्हाडांचं सरकारवर टीकास्त्र

मुंबई महानंद डेअरीचा संपूर्ण कारभार यापुढे गुजरातहून चालवला जाणार असल्याने विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारला एक डेअरी चालवता येत नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संजय राऊतांनंतर जितेंद्र आव्हाडांनी सरकारच्या या धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करीत सरकारला सवाल उपस्थित केला आहे. महानंद आता गुजरातला विकले आहे, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सख्ख्या पुतण्याने सोडली अजित पवारांची साथ, युगेंद्र पवार शरद पवार गटात!

मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणावर दबदबा असलेल्या पवार घराण्यातील तिसरी पिढीही राजकारणात सक्रिय आहे. आता पवार घराण्याचा आणखी एक वारसदार राजकारणात येत आहे. मात्र त्याने सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या गटात जाण्याऐवजी शरद पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांचे बंधु श्रीनिवास पवार यांचा सुपूत्र युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या गटात जाण्यापेक्षा शरद पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

ते वृत्त चुकीचं, 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम!

मुंबई कांदा निर्यातबंदी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदी उठवल्याचं सांगितलं जात होतं. यानंतर किरकोळ बाजारात कांद्याच्या भावात काही प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायलं मिळालं होतं. मात्र ते वृत्त चुकीचं असून ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम असल्याचं केंद्रातील एका उच्च अधिकाऱ्यांकडून सांगण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मराठा आरक्षण कोर्टात टिकेल यात शंका’, राज्य सरकारच्या विधेयकावर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई विधिमंडळात आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनात राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर केला. मात्र त्याचा पुढचा मार्ग सोपा नसल्याचं सांगितलं जात आहे. मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण कोर्टात टिकेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर शरद पवारांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं. शरद पवार म्हणाले की, कायदेशीर सल्लागारांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

शरद पवारांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. आज त्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राष्ट्रवादी पक्ष अशी मान्यता देण्याचा निर्णय दिला होता. यावर शरद पवार गटाने आक्षेप नोंदवला होता. न्या. सूर्यकांत, न्या. दीपंकर दत्त आणि न्या. के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे आमदार पात्र, विधानसभा अध्यक्षांचा महत्त्वाचा निकाल

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काल गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. शिवसेनेचा निर्णय देताना ज्या मुद्द्यांचा आधार घेण्यात आला होता, त्याच आधारावर नार्वेकरांनी राष्ट्रवादीचाही निकाल दिला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील एकही आमदार अपात्र नसल्याचा निर्वाळा देण्यात आला. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गट या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

एकीकडे आमदार अपात्रतेची टांगती तलवार, दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार बारामतीत

बारामती आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत. आजचा दिवस राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा असणार आहे. दुसरीकडे शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. आजपासून शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत. १५, १६ आणि १७ फेब्रुवारीपर्यंत शरद पवार बारामती मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. यानंतर १८ तारखेला शरद पवार पुरंदर दौऱ्यावर आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर आज निकाल

मुंबई आज राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणावर निकाल असल्याने शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्ष आज सायंकाळी हा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवलं नव्हतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत वेगळा निकाल लागू शकण्याची शक्यता […]