महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर नारायण राणेच ठरले महायुतीचे उमेदवार

प्रकल्प पूर्ण करू शकणारा लोकप्रतिनिधी ठरली जमेची बाजू X: @ajaaysaroj मुंबई: बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि अत्यंत हाय व्होल्टेज ड्रामा अपेक्षित असलेल्या सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघातून (Sindhudurg – Ratnagiri Lok Sabha)अखेर महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP candidate Narayan Rane) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील (Mahavika Aghadi) शिवसेना उबाठा गटाच्या विनायक राऊत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Palghar Lok Sabha : निवडणुकीनंतर “यांची”  राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल –  भाजपचे उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा

X: @therajkaran पालघर: निवडणुकीनंतर सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना परिवारासोबत राहण्याचा वेळ मिळेल, पण राजकारणात वेळ मिळणार नाही. निवडणूक हरल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल अशी टीका करत उद्धव ठाकरे यांनी पुत्र प्रेमासाठी काँग्रेसशी समझोता केला आणि  हिंदुत्वाचा चेहरा सोडून दिला आहे, असा आरोप  भाजपचे उत्तर प्रदेश माजी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य लोकसभा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इथे मोदींचं नाही, पवार आणि ठाकरेंचे नाणं चालेल – उद्धव ठाकरे 

पालघर  इथे मोदींचं नाणं चालणार नाही, इथे पवार आणि ठाकरे यांचं नाणं चालेल. लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडी 300 पार करून देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन करेल, असे वक्तव्य शिवसेना (ऊबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.  महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कल्याणमध्ये समोर कोणीही असो लढणार आणि जिंकणार; वैशाली दरेकर राणे यांचा दावा

X: @ajaaysaroj मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांच्यामुळे अटीतटीच्या लढतीमध्ये गणल्या जाणाऱ्या कल्याण लोकसभेत उबाठा गटाने अखेर शिवसेना महिला आघाडीच्या वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. २००९ साली मनसेकडून याच मतदारसंघात लढताना त्यांनी तब्बल एक लाख मते मिळवली होती. शिवसेनेत झालेल्या महाफुटीनंतर एक – एक जागा उबाठा गट आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अजूनही घोळ काही संपत नाही; जागावाटपावरून महायुती व आघाडीत वाद कायम

X : @NalavadeAnant मुंबई: देशभरात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरीही महाराष्ट्रात मात्र जागावाटपावरून अजूनही काही जागांवरून आघाडी व महायुतीमध्ये निर्माण झालेला घोळ अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. त्याचे कारण महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी व उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघावरून वाद सुरू झाले. सांगली लोकसभा मतदारसंघात उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेने मित्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

धुळ्याची जागा शिंदे सेनेला तर नाशिकमधून भाजप लढणार?

X : @vivekbhavsar मुंबई: धुळे – मालेगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या विरोधात जाहीर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मराठा बहुल मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघातील मालेगाव परिसरातून डॉ भामरे यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आल्याने डॉ भामरे निवडणूक लढण्याआधीच मनाने पराभूत झाले आहेत. त्यामुळे भाजपपुढे संकट उभे राहिले आहे. यातून मार्ग […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसला वाहिलेली श्रद्धांजली म्हणजे उबाठा गटाची यादी

 संजय निरुपम भडकले तर विश्वजित कदम थेट दिल्लीत गेले X: @ajaaysaroj उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाची बहुप्रतिक्षित यादी आज जाहीर झाली. काँग्रेसच्या प्रतिष्ठेच्या जागांवर उबाठा गटाने थेट उमेदवारच जाहीर केल्याने काँग्रेस नेत्यांच्या रागाचा बांध फुटला. ही यादी म्हणजे उबाठा गटाने काँग्रेसला दफन करून वाहिलेली श्रद्धांजली आहे, अशी तिखट टीका ज्येष्ठ नेते माजी खासदार संजय निरुपम […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता पवार व ठाकरेंनी आंबेडकरांचा प्रस्ताव मान्य करावा – नाना पटोले

X : @nalavadeanant मुंबई: महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नसून त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. मात्र आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली व भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा असून या जागांवर पक्षाकडे चांगले उमेदवारही आहेत. परंतु, सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही, अशा कानपिचक्या देत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

जागावाटपावरून महायुतीत शिमगा तर आघाडीत धुळवड

X: @ajaaysar मुंबई: लोकसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपावरून जोरदार शिमगा सुरू आहे, तर काँग्रेस, उबाठा गट, शरद पवार गट आणि वंचित या मविआच्या घटकपक्षांमध्ये देखील वादविवादांची धुळवड खेळली जात आहे. भाजपचे राज्यातील काही उमेदवार आधीच जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट २८ मार्चला तर शिवसेना उद्या (दि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sangli Lok Sabha: सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत ठिणगी : चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर पटोले नाराज

X: @therajkaran अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभेच्या जागेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या घोषणेनंतर चंद्रहार पाटील जोमाने प्रचाराला लागले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या याच घोषणेनंतर महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) ठिणगी पडली आहे. ठाकरेंनी सांगलीचा (Sangli) उमेदवार जाहीर केल्यामुळे […]