X: @therajkaran
पालघर: निवडणुकीनंतर सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना परिवारासोबत राहण्याचा वेळ मिळेल, पण राजकारणात वेळ मिळणार नाही. निवडणूक हरल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल अशी टीका करत उद्धव ठाकरे यांनी पुत्र प्रेमासाठी काँग्रेसशी समझोता केला आणि हिंदुत्वाचा चेहरा सोडून दिला आहे, असा आरोप भाजपचे उत्तर प्रदेश माजी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य लोकसभा प्रमुख दिनेश शर्मा यांनी पालघर लोकसभा दौऱ्यादरम्यान मनोर येथे सायलेंट रिसॉर्ट येथे आयोजित पत्रकार परिषद बोलताना केला. विरोधी पक्षाकडे मुद्दा, नीती, नियत, नेतृत्व नसल्याचं आणि विरोधी हा विरोधीच असतो, अशी टीकाही त्यांनी केली.
मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करून संघटना मजबुतीसाठी हा पालघर दौरा आयोजित केला होता. दिनेश शर्मा म्हणाले, गावं असो किंवा शहर, जनता बोलतेय की “दो बाते न जाना भुल, नरेंद्र मोदी और कमल का फूल”, “या राम का मंदिर, कमल का फूल”, ही आम जनतेची भाषा झाली आहे. आमच्या संकल्प पत्रात युवकांना रोजगाराची आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या वृद्धीसाठी तरतूद आणि नियमांचं सबळीकरण करून गरीबाची थाळी मजबूत करण्याचे काम, इतर आवश्कतेनुसार आवश्यक बाबीकडे लक्ष देण्याचे आम्ही करणार आहोत. विकासबाबत काम करणार आहोत. विमानतळ, रेल्वे स्टेशन वाढवली आहेत. संकल्प पत्रात देशातील सगळ्या सत्तर वर्षीय नागरीकांना आरोग्य विमा योजनेचा लाभ हे वरदान मिळाले आहे. उज्वला योजना आणि अन्य योजना चालू राहतील, असे यावेळी त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या सत्ता काळात पालघरमध्ये हत्याकांड झाले असल्याचे आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आला. निवडणुकीनंतर सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना परिवारासोबत राहण्याचा वेळ मिळेल, पण राजकारणात वेळ मिळणार नाही. निवडणूक हरल्यानंतर यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल, अशी टीका यावेळी त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी पुत्र प्रेमासाठी काँग्रेस समझोत्याकरीता हिंदुत्वाचा चेहरा सोडून दिला आहे, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.
पत्रकार परिषदेमध्ये दिनेश शर्मा यांनी प्रत्येक उमेदवार हा नरेंद्र मोदी असतील असे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचार जाहीर सभेत महायुतीकडून अजूनही येथे उमेदवार जाहीर केला नाही, अशी टीका महायुतीवर केली होती. पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अजूनही उमेदवार जाहीर झाला नाही, त्यामुळे येथे कुणाला उमेदवारी मिळेल? याची चर्चा केली जाते. तसेच पालघर लोकसभा मतदारसंघ अजून महायुतीकडून उमेदवार जाहीर झाला नसल्याचं पत्रकारांनी शर्मा यांना विचारला असता त्यांनी लवकरच उमेदवार जाहीर करण्यात येईल, असे सांगत सस्पेन्स कायम ठेवला.