मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘घड्याळ तेच वेळ नवी’ अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची नवी टॅगलाईन

Twitter : @therajkaran मुंबई ‘घड्याळ तेच वेळ नवी… या टॅगलाईनखाली ‘निर्धार नव्या पर्वाचा’ हा कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी दौर्‍याला ५ नोव्हेंबरपासून सुरुवात करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी शुक्रवारी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. हा दौरा पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्यात जाणार असून यामध्ये ‘निर्धार नवपर्वाचा, कार्यकर्ता व पदाधिकार्‍यांसोबत मेळावा’ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

खा. सुनील तटकरे यांना अपात्र करा : सुप्रिया सुळे यांचे लोकसभा सभापतींना पत्र

Twitter @therajkaran मुंबई पक्ष ही आपली आई असते आणि आपल्या आईबरोबर कोणी गैरव्यवहार कोणत्याच संस्कृतीस मान्य नाही. पक्ष माझ्यासाठी आईच्या जागेवर आहे. त्यात कोणीही चुकीचा व्यवहार करत असेल, तर त्यांची चौकशी आणि कारवाई हे संसदेच्या अध्यक्षांच्या नियम आणि कायद्याप्रमाणे झाल्या पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी लोकसभा अध्यक्ष […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सुप्रियाताई, तुमच्या खोट्या ‘माणुसकी’ चा बुरखा टराटरा फाटला : चित्रा वाघ

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा आरक्षणावरून आंदोलन सुरु असताना ते शांत करण्याऐवजी सुप्रिया सुळे वारंवार चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. यातून त्यांचा खोट्या माणुसकीचा बुरखा टराटरा फाटल्याची घणाघाती टीका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी बुधवारी ट्विटद्वारे केली. सुप्रिया सुळे यांची कावेबाज ‘माणुसकी’ प्रत्यक्षात हिडीस आणि ओंगळ आहे. तुम्ही रक्ताची चटक लागलेल्या राजकारणी […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

पत्रकार विरोधी वक्तव्य “बोलघेवडे” बावनकुळे यांच्या आले अंगाशी

Twitter : @vivekbhavsar मुंबई भारतीय जनता पक्षाविरोधात काहीही छापून येऊ नये यासाठी पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर घेऊन जा, असे वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. पत्रकार संघटनांनी ‘बोलघेवडे’ बावनकुळे यांचा निषेध केलाच आहे, त्याशिवाय विरोधी पक्षदेखील बावनकुळे यांच्यावर तुटून पडले आहेत. विदर्भातील इतर मागासवर्गीय तेली समाजातील चंद्रशेखर बावनकुळे यांना […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

आरक्षण मर्यादा वाढविण्याचा काँग्रेस कार्यसमितीचा ठराव – अशोक चव्हाण

Twitter : @NalavadeAnant मुंबई काँग्रेस कार्यसमितीच्या हैद्राबाद येथील दोन दिवसीय बैठकीत सामाजिक आरक्षणांची कमाल मर्यादा वाढविण्याबाबतचा ठराव पारित झाला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाला पाठबळ मिळाल्याचा दावा काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी येथे केला. ही काँग्रेसची ठाम भूमिका असून आता भाजप सरकारनेही याबाबत धोरण स्पष्ट करून संसदेच्या विशेष अधिवेशनात […]