जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंकजा मुंडेंचं आज शक्तिप्रदर्शन, उदयनराजेंच्या उपस्थितीत दाखल करणार उमेदवारी अर्ज

बीड- बीडच्या भाजपा उमेदवार पंकजा मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मराठवाड्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि सगळ्यांचं लक्ष असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात काय होणार, याकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. पंकजा मुंडे या निमित्तानं मोठं शक्तिप्रदर्शन करीत हा अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हेही या वेळी उपस्थित असतील. गेल्या काही दिवसांपासून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मविआ आणि महायुतीचे आज शक्तिप्रदर्शन; सुप्रिया सुळे, उदयनराजे, सुनेत्रा पवार आज दाखल करणार अर्ज

मुंबई : आज महाविकास आघाडी आणि महायुतीचे दिग्गज नेते निवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहे. अर्ज दाखल करताना दोन्ही बाजूकडून मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडीकडून आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी डॉ. अमोल कोल्हे, पुण्यातून रवींद्र धंगेकर हे तिन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे महायुतीचे सुनेत्रा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

” मला उमेदवारी मिळणारच होती .. ” ; उमेदवारी जाहीर होताच उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आज भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीसाठीची बारावी यादी आज जाहीर करण्यात आली आहे . या यादीत सातारा लोकसभा (Satara Lok Sabha )मतदारसंघात महायुतीकडून खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale )यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे . या मतदारसंघात त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीमधून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) रिंगणात आहेत . त्यामुळे आता या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर ; शशिकांत शिंदेशी भिडणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सातारा लोकसभेच्या (Satara Loksabha) उमेदवारीवरुन तिढा निर्माण झाला होता . हा तिढा आज सुटला असून भाजपकडून सातारच्या जागेवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या (Chhatrapati Udayanraje Bhosale) नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्याविरुद्ध ते लढणार आहेत . काही दिवसांपूर्वी खासदार […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

साताऱ्याची लढत ठरली, उदयनराजे भोसलेंना शशिकांत शिंदे देणार आव्हान, तर रावेरमधून शरद पवारांकडून श्रीरामाला संधी

मुंबई- सातारा या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कुणाला उमेदवारी दिली जाणार याची उत्सुकता अनेकांना होती. सध्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानं, महायुतीच्या उदयनराजेंसमोर कुणाला उमेदवारी द्यायची याचा पेच होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचंही नाव या मतदारसंघासाठी चर्चेत होतं. अखेरीस शरद पवारांकडून या जागी शशिकांत शिंदे यांना संधी देण्यात आलीय. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचा हुकमी एक्का रिंगणात ; साताऱ्यात उदयनराजें विरुद्ध शशिकांत शिंदे लढणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha) महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या नावावर अखेर पक्षाकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुतीचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्याविरोधात शशिकांत शिंदे अशी लढत होणार आहे. येत्या 15 एप्रिलला खासदार शरद पवार यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नाशिकचा फटका साताऱ्याला, महायुतीत तीन जागांचा तिढा अद्यापही कायम, कधी सुटणार पेच?

मुंबई- सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मोहीम दिल्ली फत्ते करुन वाजतगाजत परतलेल्या छ६पती उदयनराजे भोसले यांना अद्यापही उमेदवारी जाहीर झालेली नाही. सोमवारी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावरही पाहायला मिळाले. मात्र अद्यापही उदयनराजेंना तिकीट मिळेल की दुसऱ्या कुणाला याची धाकधूक कार्यकर्ते आणि समर्थकांत कायम आहे. महायुतीत साताराची जागा ही अ्जित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. नाशिकची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सातारच्या रिंगणात उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे मुकाबला रंगणार का?

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी निश्चित मानण्यात आली असून आता त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडून (Sharad Pawar)त्यांचे निष्ठावंत शिलेदार आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde ) यांच्यावरच ही जबाबदारी दिली जाणार असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे सातारच्या रिंगणात उदयनराजे विरुद्ध […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लकवा मारलेला हात झालाय चांगला; पवारांचे पृथ्वीराज बाबांनाच साकडे

X: @ajaaysaroj मुंबई: ज्या पृथ्वीराज चव्हाण यांचा कायम दुस्वास केला, त्याच चव्हाणांच्या आता, साताराची सीट वाचवण्यासाठी आणि बारामतीतही त्याचा फायदा उठवण्यासाठी, नाकदुऱ्या काढाव्या लागाव्यात, अशी वेळ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आली आहे. श्रीनिवास पाटील यांनी उभे राहण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर पवार गटावर आता ही जागाच काँग्रेससाठी सोडण्याची वेळ आली आहे असे बोलले जाते. त्याचप्रमाणे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पिक्चर अभी बाकी है! शरद पवारांचं कॉलर उडवत उदयनराजेंना आव्हान; मविआमधून हे 4 उमेदवार चर्चेत

सातारा : शरद पवारांची खेळी लक्षात येईपर्यंत बराच काळ लोटून जातो, असं म्हटलं जातं. आता साताऱ्यातून शरद पवारांनी कॉलर उडवत उदयनराजेंनाच आव्हान दिलं आहे. दिल्ली मोहीम फत्ते करुन आलेल्या उदयनराजेंना साताऱ्यातून कमळाच्या चिन्हावर उमेदवारी मिळणार हे स्पष्ट आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेली ही जागा भाजपाला देऊन त्याबदल्यात नाशिकची जागा महायुतीत अजित पवारांना सोडण्यात आली आहे. […]