महाराष्ट्र ताज्या बातम्या शोध बातमी

भ्रष्ट आणि निलंबित क्रीडा अधिकाऱ्यांना कोण वाचवतेय?

X: @vivekbhavsar नागपूर: राज्याच्या क्रीडा विभागातील तीन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांसह एका उपसंचालकांविरोधात भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कामे केल्याच्या आरोपावरून विभागांतर्गत चौकशी (departmental enquiry) सुरू आहे. मात्र ही चौकशी दाबण्यासाठी अधिकारी पातळीवरून प्रयत्न केले जात असून क्रीडामंत्री संजय बनसोडे (Sports Minister Sanjay Bansod) यांना याबाबत पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले आहे. ही चौकशी दाबण्यामागे कोणाचा हात आहे हे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विश्लेषण

मराठा आरक्षणाचा इतिहास आणि वर्तमान

Twitter : @vivekbhavsar मुंबई मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी लढतो आहे. लाखोंच्या संखेने ५८ मोर्चे शांततेत काढणार मराठा समाज आज अस्वस्थ आहे, सरकार आपली फसवणूक करतो आहे अशी शंका या समाजाला यायला लागली आहे. तशात काही नेत्यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. त्यातून मराठा समाज आणखीच बिथरला आणि काल बीड, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जाळपोळीच्या घटना घडल्या. […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

एकपक्षीय बहुमताचे पाशवी सरकार नको; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

Twitter : @vivekbhavsar मुंबई लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर आयोजित दसरा मेळाव्याला उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडवट टीका करताना उद्धव ठाकरे यांनी या देशात पुन्हा एका पक्षाचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शासकीय विभागात समन्वयाचा अभाव; इलेक्ट्रॉनिक धोरण अपयशी

Twitter : @vivekbhavsar मुंबई सेमी कंडक्टरसाठी लागणाऱ्या एफ ए बी (FAB) या कच्च्या मालाला प्रोत्साहन देण्यासाठी 2016 मध्ये महाराष्ट्र सरकारने आणलेल्या इलेक्ट्रॉनिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या विविध विभागात समन्वय असणे आवश्यक होते. मात्र, या संदर्भातील सुस्पष्ट निर्देश देण्यात शासन कमी पडल्याने या वेगवेगळ्या विभागात समन्वयाचा अभाव राहिला आणि परिणामी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक धोरण पूर्णपणे अपयशी ठरले आहे. […]

विश्लेषण ताज्या बातम्या राष्ट्रीय

धक्कादायक सर्वे : भाजपला देश पातळीवर आणि महाराष्ट्रात “इतक्या” जागा गमवाव्या लागतील?

Twitter: @vivekbhavsar मुंबई: भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बौद्धिक संस्था म्हणून गणल्या जाणाऱ्या “प्रबोधिनी”ने केलेला सर्वे आणि “संघा”ने देशभरातील एकेक जागेचा घेतलेला आढावा या मंथनातून निघालेले निष्कर्ष भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत धक्कादायक आहेत. या अभ्यास आणि सर्वेतून भाजपाला येत्या लोकसभा निवडणुकीत 100 पेक्षा जास्त जागांचा फटका बसणार आहे तर महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महिला अधिकाऱ्याच्या “कारभारा”मुळे फडणवीस समर्थक भाजप मंत्र्यांचे खाते जाणार?

Twitter: @vivekbhavsar मुंबई भारतीय जनता पक्षाचे राज्यातील बाहुबली नेते देवेंद्र फडणवीस हे कधी कोणाला जवळ करतील आणि कधी लाथ मारून बाजूला करतील हे सांगता येत नाही. भ्रष्टाचार आणि  भ्रष्ट नेत्याला पाठीशी न घालणारे फडणवीस यांच्या रागाचा बळी लवकरच त्यांचा एक जवळचा मंत्री ठरणार आहे आणि त्याला कारणीभूत ठरणार आहे त्या मंत्र्याकडील एका महिला अधिकारी. देवेंद्र […]

विश्लेषण राष्ट्रीय

नितीन गडकरींच्या संभाव्य पंतप्रधानपदाच्या संधीला कोण घालतोय खो?

Twitter : @vivekbhavsar  नवी दिल्ली मराठी आणि खासकरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विश्वासपात्र नितीन गडकरी यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा षड्यंत्र रचले जात आहे की काय अशी शंका यावी अशा काही घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत गडकरी हे देशाचे प्रधानमंत्रीपदी बसू शकतील अशी दाट शक्यता निर्माण झाल्याने केवळ गडकरी यांच्याच […]