ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

विधानपरिषदेसाठी ठाकरे गट रिंगणात ; अनिल परब यांच्यासह अभ्यंकर यांना उमेदवारी

मुंबई : लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या असून आता राज्यात लवकरच विधानपरिषदेच्या (vidhan parishad maharashtra election) निवडणुकीचे पडघम वाजणार आहे . राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून ( Thackeray group ) आघाडी घेत पदवीधर मतदार संघातून माजी मंत्री अनिल परब( Anil Parab) तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर (J M Abhyankar) यांना उमेदवारी देण्यात आली. ज. मो. अभ्यंकर हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत. दरम्यान ही निवडणूक शिवसेना शिंदे गटही लढवणार आहे.त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानपरिषदेतही चुरस पाहायला मिळणार आहे .

या राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी ही निवडणूक होणार आहे. राज्यातील दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक १० जून रोजी जाहीर झाली होती. परंतु त्याला शिक्षक संघटनांनी विरोध केल्यानंतर नवीन तारीख २६ जून रोजी करण्यात आली. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे.मुंबई पदवीधर मतदारसंघावर पूर्वी भाजपचे वर्चस्व होते. परंतु शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांनी भाजपचे वर्चस्व मोडत शिवसेनेचे वर्चस्व निर्माण केले. यामुळे गेल्या ३० वर्षांपासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. आता त्यांच्याकडून दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत . यामध्ये उमेदवारी मिळालेले ज. मो. अभ्यंकर हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत. शिक्षकांचे प्रश्न आणि समस्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.आता ते राजकारणात विधानपरिषदेच्या निवडणुकीतून सक्रिय झाले आहेत .

शिवसेनेतील बंडानंतर मुंबई पदवीधर मतदार संघावर शिंदे गटाचा दावा आहे.मात्र यासाठी भाजपही निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे . शिंदे गटाकडून माजी मंत्री डॉ. दीपक सावंत निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे. भाजपकडून किरण शेलार यांची तयारी सुरु आहे. त्यासाठी शेलार यांनी मोठ्या प्रमाणावर मतदारांची नोंदणी केली आहे.आता या निवडणुकीसाठी भाजप , शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना अशी चुरस पाहायला मिळणार आहे .

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात