मुंबई : लोकसभेच्या रणधुमाळीत (Lok Sabha Election)पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असताना आता सहाव्या टप्प्याचे मतदान सुरु झाले आहे. त्यानंतर सातव्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागेल असताना याबाबाबत राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा भाजप सरकार सत्तेवर येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता . आता भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) (Reserve Bank of India )घेतलेल्या निर्णयामुळे ‘फिर एक बार मोदी सरकार’ येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे . आरबीआयने सरकारला विक्रमी लाभांश (डिव्हीडेंड) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय निवडणुकासंदर्भात जोडलाजात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा सत्तेत येणार असल्याचे हे संकते मानले जात आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा संपल्यानंतर ४ जून रोजी देशाचे पंतप्रधान कोण होणार? याचा फैसला होणार आहे .दरम्यान आरबीआयने सरकारला दिलेला लाभांश पाहता या निवडणुकीत मोदींना यांचा फायदा होणार आहे . 2023-24 या आर्थिक वर्षात आरबीआय सरकारला 2.11 लाख कोटी रुपये देणार आहे. 2022-23 मध्ये 87,416 कोटी रुपयांचे डिव्हीडेंड आरबीआयने दिला होता. आरबीआयच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा मोदी सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे .आरबीआयने दिलेला हा लाभांश म्हणजे सरकारसाठी मोठा दिलासा आहे. यामुळे वित्तीय तूट कमी होण्यास मदत होईल. सरकार विविध सामाजिक आणि विकास कार्यक्रमांसाठी वापरण्यास सक्षम असेल. नवीन सरकार जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. या रकमेमुळे अनेक योजनांसाठी सरकारच्या हातात पैसा येणार आहे.
आरबीआयच्या निर्णयामुले भाजप सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत आहेत . याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. आरबीआयने सरकारला 2.11 लाख कोटी रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून निश्चित केलेल्या बजेटपेक्षा ही रक्कम दुप्पट आहे. सरकारने 1.02 लाख कोटी रक्कम निश्चित केली होती. या निर्णयानंतर गुरुवारी आणि शुक्रवारी शेअर बाजारात दमदार वाढ झाली.