ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी विजय शिवतारे यांच्यावर टीका केली आहे. याबरोबरच त्यांनी भाजपचाही समाचार घेतला. विजय शिवतारे यांचं नामकरण पलटूराम झाले झालं असून लोक आता निष्ठावंत राहिल नसल्याचंही अहिर यावेळी म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती दौऱ्यावर असताना अहिरांनी हे वक्तव्य केलं.
अहिर म्हणाले, मी सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीत येऊन बसणार आहे. भाजपला राज्यात विरोधी पक्ष ठेवायचा नाही. निधी विरूद्ध निष्ठा अशी ही लढाई आहे. बापू तर काय बोलत होते. आम्हाला वाटलं की नवीन वाघ तयार झाला. पण पुढं काय झालं तुम्ही बघा, विजय शिवतारे यांचे नामकरण ‘पलटूराम’ असेही ते यावेळी म्हणाले.
विजय शिवतारे यांना बारामती लोकसभेतून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी बंड पुकारलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतरही ते निवडणूक लढवण्यावर ठाम होते. इतकच नाही तर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र फडणवीस-शिंदे यांच्या एकत्रित भेटीनंतर शिवतारेंनी माघार घेतली. शिवतारेंच्या या भूमिकेवरुन विरोधकांकडून त्यांना घेरलं जात आहे.
दरम्यान सध्या एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत सचिन अहिर म्हणाले की, ”खडसे यांच्याबद्दल खर की खोटं माहीत नाही. पण विरोधी पक्षातील नेते फोडण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर का आलीय?” असा सवाल अहिरांनी केला.