महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘शब्दुली’ च्या काळजातली हाक आता कायमची निःशब्द झाली !

मराठी साहित्याला विनोदाचे अचूक भान, रंगभूमीला प्रयोगशीलता, आणि कादंबरी व कथांमधून मानवी भावनांचे सखोल दर्शन घडवणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार प्रा. अनिल सोनार यांचे काल धुळ्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा साहित्य प्रवास हा मराठी साहित्यातील विविध अंगांना समृद्ध करणारा ठरला. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य आणि रंगभूमीला अपूर्णतेची भावना येणे साहजिक आहे. त्यांच्या साहित्याने वाचकांना हसवले, विचार करायला लावले आणि समाजाच्या विविध बाजूंचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले.

प्रा. अनिल सोनार यांचा जन्म १८ मार्च १९४५ साली झाला. त्यांनी आपल्या लेखन प्रवासाची सुरुवात ‘सारे प्रवासी तिमिराचे’ या नाटकाने केली. या नाटकाने व्यावसायिक रंगभूमीवर नवी ऊर्जा निर्माण केली. ‘कलावैभव’ या नाट्यसंस्थेने हे नाटक प्रेक्षकांसमोर सादर केले, आणि ते भरभरून गाजले. त्यांनी लिहिलेले ‘मालकीण मालकीण दार उघड’ हे नाटक देखील त्याकाळी प्रचंड यशस्वी ठरले. आत्माराम भेंडे, बबन प्रभू, किशोर प्रधान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांनी यामध्ये काम केले, ज्यामुळे या कलाकृतीला आणखी उंची प्राप्त झाली.

प्रा. सोनार यांची साहित्यकृती फक्त नाटकापुरती मर्यादित राहिली नाही, तर त्यांची लेखणी कादंबरी, कथा, एकांकिका, कवितांचे विडंबन, आणि विनोदी लेखसंग्रह अशा विविध साहित्यप्रकारांत वावरली. ‘गणपत वाणी’ हे त्यांचे नाटक महाराष्ट्र शासनाचा ‘राम गणेश गडकरी पुरस्कार’ विजेते ठरले. तसेच त्यांच्या ‘द्वंद्व’ या नाटकाला नवी दिल्लीतील अखिल भारतीय नाट्यस्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले होते.

त्यांनी आजवर ७२ हून अधिक साहित्यकृती लिहिल्या, ज्यामध्ये कादंबर्‍या, कथा, नाटके, आणि विनोदी साहित्याने महत्त्वाचे स्थान मिळवले. ‘उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक’ हा त्यांचा विनोदी लेखसंग्रहाला जयवंत दळवी स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

त्यांचे ‘फुलपाखराचा दंश’ हा कथासंग्रह विशेषत्वाने गाजला. यामधील ‘संन्यासिनी’ ही कथा १४ भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली, ज्यामुळे त्यांचे लेखन व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचले. त्यांनी हिंदी भाषेतही नाटक लेखन केले, ज्यामुळे त्यांच्या प्रतिभेचा व्यापक विस्तार दिसून येतो. त्यांचे ‘वर्षां विडंबन’ हे पुस्तक मराठी साहित्यातील एक अनोखा प्रयोग ठरले. मराठीतील विविध कवींच्या शैलींचे विडंबन त्यांनी या पुस्तकात केले. पावसावर आधारित कविता त्या कवींच्या शैलीत कशा असतील, हे त्यांनी अतिशय मार्मिक व विनोदी स्वरूपात मांडले. त्यांच्या लेखनशैलीतून समाजातील विसंगतींचे अचूक चित्रण होत असे.
त्यांच्या ‘मालकीण मालकीण दार उघड’ या नाटकाने प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ टिकणारी छाप पाडली. त्यांच्या नाटकांमध्ये अतिशय चपखल संवाद आणि घटनाक्रम होते, ज्यामुळे प्रेक्षक भारावून जात असत. ‘गणपत वाणी’, ‘चंद्रहास’, ‘प्रतिकार’, ‘अग्निवेश’, ‘द्वंद्व’ अशी अनेक नाटके प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.ङ्गङ्गप्रा. सोनार यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांनी त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेतली आहे. त्यांच्या ‘गणपत वाणी’ नाटकाला ‘राम गणेश गडकरी पुरस्कार’, ‘मालकीण मालकीण दार उघड’ या नाटकाला आचार्य अत्रे फाऊंडेशनचा ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार, तर ‘द्वंद्व’ या नाटकाला राष्ट्रीय पातळीवरील पहिले पारितोषिक मिळाले.

प्रा. सोनार यांचे लेखन कधी हसवणारे, कधी विचार करायला लावणारे, तर कधी अंतर्मुख करणारे होते. त्यांच्या ‘बिनपराचा कावळा’, ‘विश्वसुंदरी सुलभ हप्त्यावर’, ‘फुलपाखराचा दंश’, ‘तोपर्यंत नमस्कार’, ‘कविता सच्ची कच्ची आणि लुच्ची’ अशा साहित्यकृतींनी मराठी वाचकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केले.

ङ्ङ्प्रा. अनिल सोनार यांचे साहित्यिक कार्य मराठी साहित्यातील अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यविश्वाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

नेहरूनगर, देवपूर, धुळे येथील त्यांचे निवासस्थान ‘शब्दुली’, ज्यात त्यांच्या शब्दांनी एक विश्व उभारले होते, आपल्या असंख्य साहित्यकृतींनी मने मोहवणार्‍या, हृदयाच्या गाभ्यापर्यंत पोहोचणारं ‘शब्दुली’ त्यांच्या नसण्याने भकास आणि निःशब्द झाले आहे. त्यांच्या जाण्याने साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या साहित्यकृती जिवंत आहेत, पण त्यांचं हसतं-मुसकाळतं अस्तित्व आता फक्त आठवणींत उरलं आहे.

‘शब्दुली’त त्यांच्या रिक्ततेतून निःशब्दपणे उमटलेली पोकळी कधीच भरून येणार नाही त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच प्रार्थना !

रणजितसिंह राजपूत,
जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार.
मो. क्र. ९४२२७८५५५५

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात