ताज्या बातम्या महाराष्ट्र

पेपर फुटीचे सभागृहाबाहेर तीव्र पडसाद; विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन  

X : @therajkaran

मुंबई : राज्यातील पेपर फुटीचे तीव्र पडसाद आज पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) दुस-या सप्ताहात विधीमंडळाबाहेरही उमटले.

पेपरफुटीविरोधात (paper leak) कठोर कायदा करावा, या मागणीसाठी आज विधानभवन पायर्‍यांवर विरोधकांकडून आंदोलन (protest by opposition) करण्यात आले.  पेपरफुटीप्रकरणी विरोधी सदस्य आक्रमक होऊन, फलक हाती घेऊन  घोेषणा देत होते. पेपरफुटी विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे ही मागणी विरोधकांनी केली. सत्ताधाऱ्यांनी मध्येच आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी त्यांच्या समोर जाऊन आंदोलन केले.

या वेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,  बाळासाहेब थोरात,  रोहित पवार, सतेज पाटील आदी उपस्थित होते.   

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात