केद्रीय रस्ते परिवहन व राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उत्तर पश्चिम चे खासदार रविंद्र वायकर यांना दिले आश्वासन
X : @therajkaran
नवी दिल्ली
गणेशोत्सवापूर्वी (Ganesh festival in Konkan) कोकणात जाण्यासाठी रस्ते प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांच्या मार्गात कुठलेही विघ्न येऊ नये याची खबरदारी घेण्याबरोबरच गणेशोत्सवापूर्वीच मुंबई – गोवा मार्गावरील (Mumbai Goa National Highway) खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन केद्रीय रस्ते परिवहन व राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी मुंबई उत्तर पश्चिमचे शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर (Shiv Sena MP Ravindra Waikar) यांना दिले.
मुंबई – गोवा राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या १० वर्षापासून सुरु आहे. ४७१ कि.मी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम २०११ पासून सुरु करण्यात आले. अद्याप हे काम पूर्ण झाले नसून या कामाला विलंब होत आहे. या राज्य मार्गाचे काम टप्प्या – टप्प्याने करण्यात येत आहे. या मार्गाचे काम जिथे पूर्ण करण्यात आले आहे, त्यातील अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या राज्य मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई – गोवा महामार्गावरील प्रवास खड्डे मुक्त करावा, असे निवेदन खासदार रविंद्र वायकर यांनी मंत्री गडकरी यांना दिले.
हे ही वाचा : https://www.maharashtra.city/cities/raigad/raigad-press-club-warns-of-agitation-for-goa-highway-repair/: गणेशोत्सवापूर्वीचे गणेशभक्तांचा कोकण प्रवास खड्डे मुक्त करणार!गणेशोत्सवापूर्वी मुंबई – गोवा राज्य मार्गावरील खड्डे (potholes) बुजवण्यात येतील, असे आश्वासन मंत्री नितिन गडकरी यांनी दिले. त्याच बरोबर या मार्गावर बांधण्यात येणारे ट्रामा हॉस्पिटलचे (Trauma hospital) काम लवकर सुरु करून ते पूर्ण करावे, अशी विनंती वायकर यांनी मंत्री नितिन गडकरी यांना यावेळी केली. तसेच डिसेंबरपर्यंत या राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही मंत्री गडकरी यांनी यावेळी सांगितले.
मुंबई – गोवा राज्य मार्गावरील भोस्ते घाट येथे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. भोस्ते व परुशुराम घाट येथे भूस्खलन (land sliding) होत आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी टनेल बांधण्याचे काम करण्यात यावे, अथवा रेल्वे मार्गाला लागून समांतर रस्ता तयार करण्यात यावा, असे वायकर यांनी गडकरी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.