महाराष्ट्र ताज्या बातम्या

Kolhapur Lok Sabha : कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग : उद्धव ठाकरे घेणार शाहू महाराजांची गुरुवारी भेट

X: @therajkran

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापूरमधून श्रीमंत शाहू छत्रपती (Shahu Maharaj)
काँग्रेसकडून (Congress) निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackderay) प्रथमच कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर येत आहेत. उद्या गुरुवारी ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची राजवाड्यावर जाऊन भेट घेणार आहेत. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलेल्या माहितीमुळे उद्धव ठाकरे महाराजांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास राजवाड्यावर महाराज आणि उद्धव ठाकरे यांची भेट होईल. या भेटीवेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह शिवसेना उपनेते संजय पवार यांची उपस्थिती असणार आहे. या भेटीमध्ये अर्थातच कोल्हापूर लोकसभेच्या अनुषंगाने तसेच हातकणंगले लोकसभेच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या भेटीची राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी शाहू महाराजांच्या प्रचारार्थ राधानगरी तालुक्याचा दोन दिवसीय दौरा केला. पहिल्या टप्प्यातील या दौऱ्यात तालुक्यातील प्रमुख राजकीय मंडळींच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी अनेक शेतकरी, कामगार बांधव व महिला भगिनींशी देखील संवाद साधला. शाहू छत्रपती महाराजांच्या रूपाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वाहत असून सर्वसामान्य जनतेच्या भावनेतून महाराजांच्या विजयाची निश्चिती मिळाली, अस संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात