वंचितची पाचवी यादी समोर आली आहे. या पाचव्या यादीत दहा उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत वंचितकडून चार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आज पाचवी यादी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांना वंचितने पुण्यातून उमेदवारी जाहीर केली होती. दरम्यान आज वंचितची पाचवी यादी समोर आली आहे.
रायगड – कुमुदिनी चव्हाण (हिंदू मराठा) धाराशिव – भाऊसाहेब अंधलकर (लिंगायत) नंदूरबार – हनुमंत सुर्यवंशी (टोकरे कोळी) जळगाव – प्रफुल्ल लोढा (जैन)
दिंडोरी – गुलाब बर्डे (भिल)
पालघर – विजया म्हात्रे (मल्हार कोळी) भिवंडी – निलेश सांबरे (हिंदू कुणबी)
मुंबई उत्तर – बीना सिंह (क्षत्रिय)
मुंबई उत्तर पश्चिम – संजीव कालकोरी (ब्राम्हण) मुंबई दक्षिण मध्य – अब्दूल हसन खान (मुस्लीम) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नाना पटोले हे छुपे पणाने भाजपसाठी काम करीत असल्याचा आंबेडकरांचा आरोप आहे. अनेक ठिकाणी नाना पटोलेंनी क्षमता नसलेले उमेदवार उभे केले, नांदेडमध्येही डायलेसिसवर असलेला आणि फार फिरता येणं शक्य नसलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली. पटोलेंनी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांसोबत मॅच फिक्सिंग केल्याचाही आरोप आंबेडकरांनी यावेळी केला.
अकोल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं संताप व्यक्त केलाय. काँग्रेसचा उमेगवार हा संघ विचारांचा असल्याचा प्रचार सध्या अकोल्यात करण्यात येतोय. चार वेळा या मतदारसंघातून निवडून आलेल्या संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रेंना भाजपानं तिकिट दिलंय. तर वंचितचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून रिंगणात आहेत. संघ विचारांचा उमेदवार देणारे नाना पटोले हे भाजपाचे स्लीपर सेल म्हणून कार्यरत असल्याचा आरोप करण्यात येतोय.