X: @therajkaran
नागपूर:
शिवसेना आमदार अपात्रतेविषयी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narwekar) यांच्यापुढे पुढील सुनावणी आजपासून येथे सुरू झाली. पत्रकारांशी आज ७ डिसेंबर या दिवशी अनौपचारिक संवाद साधतांना, राहुल नार्वेकर म्हणाले की, विधानसभा सदस्य म्हणून अपात्र झालेली व्यक्ती विधान परिषद निवडणूक लढवू शकते; मात्र तीस वर्षे पूर्ण वयोमर्यादा आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा नोंद नसणे आवश्यक आहे. विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोर्हे (Dr Neelam Gorhe) या वेळी उपस्थित होत्या.
अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, ‘‘सर्वाेच्च न्यायालय आणि विधीमंडळ दोन्ही स्वायत्त संस्था आहेत. दोन्ही एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. असे असले तरी सर्वाेच्च न्यायालय (Supreme court is Constitutional body) संविधानिक संस्था असल्यामुळे त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आमदारांच्या अपात्रतेविषयी (Disqualification of MLAs) निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आमदारांच्या पात्रते विषयीचा निर्णय ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत. विधीमंडळ हिवाळी अधिवेशन (Winter session) चालू असल्यामुळे सभगृहाचे काम संपल्यानंतर अतिरिक्त वेळेत हे सुनावणीचे काम होईल,अशी माहिती त्यांनी दिली.