X: @therajkaran
बेधडक वक्तव्याने नेहमी चर्चेत असणाऱ्या वसंत मोरे (Vasant More) यांनी पुण्यातील लोकसभेचे (Pune Lok Sabha) मैदान गाजवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही निवडणूक कुठल्या पक्षाकडून लढणार की अपक्ष याबाबतचा निर्णय झालेला नाही. परंतु आपण ज्या दिवशी मैदानात उतरु, त्या दिवशी पुणे लोकसभेचे चित्र बदलणार आहे. ही लढत एकतर्फी होईल, असा दावा वसंत मोरे यांनी करताना आपला विजय निश्चित असल्याचे म्हटले.
सध्या लोकसभेच्या रणधुळीत सर्वाधिक चर्चा पुणे जिल्ह्याची सुरु आहे. पुणे जिल्हा पवार कुटुंबियांमुळे चर्चेत आला आहे. बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची लढत रंगणार आहे. यामुळे या मतदारसंघाची चर्चा होत आहे. तर दुसरीकडे पुण्यातून आपणच निवडणूक लढवणार असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठीच ते मनसेतून (MNS) बाहेर पडले आहेत. “ज्या दिवशी मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, त्या दिवशी पुणे शहरातील चित्र बदललेले असणार आहे. त्यानंतर ही निवडणूक एकतर्फी कशी होईल, हे तुम्हाला दिसणार आहे,” असा दावा वसंत मोरे यांनी केला आहे.
दरम्यान, भाजप उमेदवार मुरलधीर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचा प्रचार सुरु झाला आहे. आपली अजून काहीच तयारी नाही? असा प्रश्न वसंत मोरे यांना विचारला असता वसंत मोरे म्हणाले, योग्य वेळी योग्य निर्णय आपण जाहीर करणार आहोत. मला महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) उमेदवारी दिली नाही तरी मी निवडणूक लढणार आहे. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढलो तरी पहिल्या क्रमांकावर असणार आहे. यापूर्वी मुरलीधर मोहोळ महापौर होते आणि मी विरोधी पक्षनेता होतो. ज्या – ज्या वेळी संघर्ष त्या – त्या वेळी विजय मिळवला आहे, असे त्यांनी सांगितले.
याअगोदर चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी मला भाजपमध्ये (BJP) येण्याची ऑफर दिली होती. तुम्ही भाजपमध्ये या, तुम्हाला निवडून आणू असे ते म्हणाले होते. ही लढत एकतर्फी होईल. परंतु मी त्यांना आठवण करुन दिली. आपण मनसे आणि भाजप युती, राज ठाकरे (Raj Thackeray), अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यासंदर्भात काहीच बोलणार नाही, असे वसंत मोरे म्हणाले.