ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी अटकेत

मुंबई

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरण्यात आली होती. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपी किंचक नवले याला पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली आहे. त्याला वांद्रे येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरुन त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. याशिवाय हा व्हिडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांनाही ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. अखेर फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपी किंचक नवले याला पोलिसांनी अटक केली आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात