मुंबई : अमरावती मतदारसंघात भाजपकडून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर प्रहारकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे .आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu)आणि शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Vithoba Adsul)यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे. आता बच्चू कडूंनी राणांनी मेळघाटमध्ये वाटलेल्या साड्यांवर जोरदार टीका केली आहे . साडे 17 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जत केली गेली. आपण 2 कोटींच्या गाडीत फिरायचं आणि साडे 17 रुपयांच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था करायची. परंतु ही साडे 17 रूपयांची साडी मतदारांचं मत परिवर्तन करू शकत नाही, असं वक्तव्य करत आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पला दांपत्याला चांगलंच डिवचलं आहे . .
नवनीत राणा यांना कोंडीत पकडण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी मोठी खेळी करत त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब (Dinesh Boob )यांना उमदेवारी दिली . तसेच रानांनी महायुतीतील नेत्यांनी आपल्याला मदत करावी अशी विनंती केली होती. त्यावर बच्चू कडू म्हणाले की, आता तीर सुटला आहे, तो मागे येणार नाही. नवनीत राणा यांच्या विनंतीचा आम्ही आदर करतो पण आता तीर सुटला आहे, तो निशाणा साधूनच थांबेल.त्यांचा दोन लाखाने पराभव करू, वेळ आली तर त्यांचं डिपॉझिट जप्त करू असं वक्तव्य करत त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे .मात्र दुसरीकडे राणाचा विजय होईल असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी केला आहे . ते म्हणाले , नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर कुणीही नाराज नाही, आमचे कार्यकर्ते काहीही बोलले नाहीत. महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील. महायुतीचे लोक मदत करतील. महायुतीचे उमेदवार 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील. त्यांचे जात प्रमाणापत्र बरोबर आहे. कोर्टाच्या निकालात ते स्पष्ट होईल असेही बावनकुळे म्हणाले आहेत.
त्यानंतर बोलताना ते म्हणाले , एकनाथ शिंदेच्या महायुतीत बच्चू कडू आहेत. शिंदेमार्फत त्यांचा भाजपशी संबंध आहे. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बच्चू कडूचा तिढा सोडवा, अशी विनंती करणार आहोत. त्यानंतरही बच्चू कडू यांनी ऐकले नाही तर मतदार निर्णय घेतली. असे त्यांनी स्पष्ट केले.