मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तिसऱ्या टप्प्यामध्ये 11 मतदारसंघात निवडणूक होत असतांना अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर (kolhapur )आणि हातकणंगले( hatkangle )मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं असल्याची माहिती समोर आली आहे . सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये 63.71 तर शेजारच्या हातकणंगलेमध्ये 62.18 टक्के मतदान झालं आहे. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे शाहू महाराज आणि शिवसेनेचे संजय मंडलिक अशी लढत होत आहे.
निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 53.40% मतदान झाले आहे. तर लातूर – 55.38 %, सांगली – 52.56 %, बारामती – 45.38%, हातकणंगले- 62.18%, कोल्हापूर – 63.71%, माढा – 50%, धाराशिव – 52.78%, रायगड – 50.31%, रत्नागिरी – 53.75%, सातारा – 54.11% व सोलापूर लोकसभा मतदारसंघात 49.7% मतदान झाले. यात विशेष करून कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. तर बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे. दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होत आहे. राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील सरुडकर असा सामना हातकणंगले लोकसभेसाठी रंगला आहे. आता यामध्ये बाजी कोण मारणार राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे .
दरम्यान दुसरीकडे राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा( baramati loksabha )मतदारसंघात इतर मतदारसंघाच्या तुलनेत फारच कमी मतदान झालं असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत 45.68 टक्के मतदान झालं आहे .त्यामुळे बारामतीमध्ये यावेळी सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत असून शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.