मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं (PM Narendra Modi) यांनी सभांचा धडाका लावला आहे. आज त्यांनी अहिल्यानगर मध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेस (congress )आणि इंडिया आघाडीवर (india aaghadi ) जोरदार टीका केली आहे . ते म्हणाले , इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता संपत आली आहे. देशात भाजप आणि एनडीएला लोकांचं मोठं पाठबळ मिळत आहे. आम्ही नेहमी विकास आणि संरक्षणावर भर दिला आहे . भाजप आणि एनडीएचे मुद्दे काय आहेत तुम्हीच बघा. एनडीएचा मुद्दा विकास, गरीब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा स्वाभिमान, देशाचा सन्मान पण काँग्रेस या पैकी कोणत्याही मुद्द्यावर बोलते का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित करत आघाडीवर हल्लाबोल चढवला आहे .
इंडीया आघाडी आपल्या देशाचे संविधान बदलू इच्छित आहेत. त्यांनी फक्त गरिबांना फसवलं आहे . खोटी आश्वासने दिली आहेत . आपल्या वोट बँकेला खूश करण्यासाठी हा प्रयत्न आहे. हे कोणत्याही थराला जावू शकतात. तुम्ही असं होऊ देऊ इच्छिता का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे . काँग्रेसने सुरु केलेल्या समस्या आम्ही संपवल्या. येथे सुरु झालेल्या डॅमचे काम १९७० मध्ये सुरु झाले होते. आज त्याची किंमत करोडो रुपयांनी वाढली आहे. हे पाप काँग्रेसचे आहे. काँग्रेसने नेत्यांचा खिशा भरला. पण शेतकऱ्यांची जमीन कोरडी राहिली. देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला गती दिली. यामुळे नाशिक आणि अहिल्यानगरमधील शेकडो गावांना पाणी मिळणार आहे.’असे पंतप्रधान म्हणाले .
काँग्रेसवर अधिक बोलो तरी ते लपून बसतील अशी स्थिती आहे . त्यांच्याकडे बोलण्यासाठी काही नाहीये. त्यांनी ५० वर्षात गरीबी हटवण्यासाठी खोटी आश्वासने दिले. गरीबांचा सर्वात मोठा विश्वात घात केला. मोदी ८० कोटी लोकांना मिळत असलेल्या राशनचा हिशोल देईल. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या निधीचा हिशोब देईल असे ही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले . ’