मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राजकीय करिअर धोक्यात असल्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचं विलिनीकरण करीत पक्षाची धुरा तुमच्या हातात घ्या, असा महत्त्वाचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. प्रस्तावामुळे एकनाथ शिंदे यांचं राजकीय करिअर धोक्यात सापडले असंही या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा अमित शाह यांची भेट घेत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या, ही भेट लोकसभेच्या पार्श्वभूमीवर असल्याची चर्चा होत असताना या बातमीने मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे. यावेळी अमित शाह यांनी राज ठाकरेंपुढे शिवसेनेसोबत विलिनकरणाचा प्रस्ताप ठेवला, याशिवाय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे तुम्हीच खरे वारसदार आहात. त्यामुळे तुम्हीच शिवसेनेचं नेतृत्व करा, असंही शाह यांवेळी म्हणाल्याचा उल्लेख बातमीत करण्यात आला आहे.
राज ठाकरेंकडून भाजपला भविष्यकाळात दीर्घकालीन भागीदारीचे अपेक्षा असल्याचं दिसतंय. याशिवाय राज ठाकरे यांनी लोकसभेच्या ४६ जागांसाठी एनडीएचा प्रचार करावा. विधानसभेत त्यांना याचा परतावा मिळेल असंही या बैठकीत दर्शविण्यात आल्याचा दावा द न्यू इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे.
राजकीय कारकीर्दीचा शेवट?
एकनाथ शिंदेंना हा प्रस्ताव अमान्य असल्याचं समजते. तसेच त्यांना त्यांच्या पक्षातील नेते व लोकप्रतिनिधींनाही या योजनेची कल्पनेची माहिती देऊन त्यांचे मतैक्य करण्याची सूचना करण्यात आली आहे, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे. या प्रस्तावामुळे शिंदेच्या राजकीय कारकीर्दीचा शेवट होऊ शकतो. त्याशिवाय शिंदे गटाच्या नेत्यांनाही हा प्रस्ताव मान्य असेल याची शक्यता कमीच आहे.