मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून राजकारणातील फोडाफोडीच्या प्रकरणांची संख्या वाढली आहे. आधी शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी आता लोकसभा निवडणुकीच्या तारख्या जवळ आल्यानंतर तिकिटासाठी अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहे. दरम्यान भाजप नेत्याने शरद पवारांबद्दल धक्कादायक विधान केलं आहे. शरद पवार पक्ष फोडण्यात मास्टर असल्याचं विधान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.
महाड येथील भाजप कार्यकर्त्याच्या मेळाव्यात बोलताना दरेकरांनी हे विधान केलं. राज्यात ज्या शरद पवारांनी पक्ष फोडण्याचा इतिहास रचला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि पक्ष फोडणाऱ्यांविषयी जनतेच्या मनात चीड आहे असं म्हणायचं. हा विरोधाभास असल्याचा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला. शरद पवार हे पक्ष फोडण्यामध्ये मास्टर आहेत. त्यांचं राजकारण पक्ष फोडण्यापासून सुरू झालंय आणि आजही सुरू असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी स्वत: आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पुढील 15 दिवसांत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली आहे. दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी पुढील 15 दिवसांत दिल्लीला जाणार आणि भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. म्हणजेच एकनाथ खडसे यांनी पक्षातील घरवापसीवर त्यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.