मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे .महाराष्ट्रात येत्या 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) मतदानाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aaghadi) लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे.. विशेष म्हणजे या यादीत मुंबईच्या ( mumbai )तीन जागांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई उत्तरच्या जागेसाठी बीना सिंह (Bina Singh) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मुंबई उत्तर पश्चिममधून संजीवकुमार कलकोरी (Sanjeevkumar Kalkori) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दक्षिण मध्य मुंबई मधून अब्दुल खान (Abdul Ghaffar Khan) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वंचितकडून रायगड लोकसभेच्या जागेसाठी कुमूदानी चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर धाराशिवमधून भाऊसाहेब अंधाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नंदुरबारमधून हनुमंत कुमार सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून प्रफुलकुमार लोढा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून गुलाब बर्डे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पालघरमधून विजय म्हात्रे तर भिवंडीमधून निलेश सांबरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान वंचितच्या या उमेदवारांमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फटका बसू शकतो .मात्र या निवडणुकीत त्यांना आता कितपत यश मिळतं ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे . .
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची महाविकास आघाडीसोबत चर्चा फिस्कटल्यानंतर त्यांनी राज्यातील सर्वच मतदारसंघांवर उमेदवार उतरवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे . आतापर्यंत वंचितने राज्यात २२ लोकसभा मतदारसंघात उमेदवार घोषित केले आहेत. मात्र वंचितच्या जाहीर झालेल्या यादीमध्ये एकही ब्राह्मण जातीचा तसेच कोणत्याही जातगटाची एकही महिला उमेदवाराचा समावेश नाही