मुंबई : आगामी लोकसभेसाठी अमरावती लोकसभा मतदारसंघातील (Amravati Lok Sabha Constituency) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे . या निवडणुकी दरम्यान महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) आणि प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वादात आता अधिक भर पडली असून बच्चू कडूंना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) पाठबळ असल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. नवनीत राणा यांना पाडण्यासाठी ठाकरेंनी मातोश्रीवरुन पैसे पूरवत सुपारी घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.त्यामळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .
राणा म्हणाले , बच्चू कडूंवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत . त्यांची संपत्ती माझ्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. खऱ्या अर्थानं बच्चू कडू यांनी आपली संपत्ती जाहीर करावी, जर माझी संपत्ती जास्त असेल तर मी त्यांना देईल आणि बच्चू कडू यांची जास्त असली तर त्यांनी ती जनतेत वाटावी, असं मी त्यांना आवाहन देतो . आजपर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर नाही , जर त्यांची संपत्ती माझ्या संपत्तीपेक्षा कमी निघाली तर मी राजकारण सोडेल, असे खुले आव्हान मी करतो असे ते म्हणाले आहेत .. दरम्यान याआधी प्रहारचा उमेदवार आणि बच्चू कडू यांना कशाप्रकारे अडचणीत आणता यईल आणि त्यांना कशी अटक करता येईल, याचा सुनियोजित कट राणा दाम्पत्याकडून करण्यात आल्याचा आरोपही बच्चू कडू यांनी बोलताना केला होता . यावरून आता नवीन वादाला तोंड फुटले आहे .
या बच्चू कडू यांचे सोंग संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे. आंदोलन करून कुठेतरी मीडियात राहण्याचा बच्चू कडू यांचा नेहमीच प्रयत्न असतात. ज्या थाळी मध्ये खातो त्याच थाळीमध्ये छेद पाडण्याचा धंदा बच्चू कडू करत असतात’. बच्चू कडू यांच्यासोबत जी काही लोकशाही मार्गाने कायदेशीरदृष्ट्या लढाई करायची ती करण्यास मी तयार असल्याचा देखील रवी राणा यांनी सांगितले. आता याला प्रहार काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .