ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुतीत नवा ट्विस्ट, नाशिकमधून प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना महायुतीत नाशिकच्या जागेचा मुद्दा प्रचंड गाजतोय . या मतदारसंघात काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीर माघार घेतली होती . भुजबळांच्या घोषणेनंतर महायुतीकडून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची हा पेच निर्माण झाला होता .आता भाजपकडून प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चाना जोर आला आहे . त्यामुळे प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .

या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजाभाऊ वाजे यांचे प्रचाराची एक फेरीदेखील पूर्ण झाली आहे. महायुतीत (Mahayuti) मात्र नाशिकच्या जागेवरून तिढा निर्माण झाला असताना आता थेट प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आले आहे. दरम्यान काल बीड लोकसभा मतदारसंघाच्या (Beed Lok Sabha Constituency) भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ‘मला बीडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रितम मुंडेंचं काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र प्रीतम मुंडे यांची काळजी करू नका. मी तिला नाशिकमधून (Nashik) उभी करेन, असे वक्तव्य त्यांनी केल होत . त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान या मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची वारंवार भेट घेतली होती . मात्र तरीही त्यांच्या नावाची घोषणा अजूनही झालेली नाही. तसेच शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी हेमंत गोडसेंच्या नावाला काही अडचण असल्यास मी देखील इच्छुक आहे असे म्हटले होते . आता. नाशिकची जागा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या तीनही पक्षांसाठी आता प्रतिष्ठेचा विषय बनल्याचे दिसून येत आहे. आता नाशिकची जागा नेमकी कुणाला मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात