मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरु आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha)महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule )आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)या नणंद-भावजयमध्ये लढत होत आहे. त्यामुळे ही निवडणूक माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजितदादांवर टीकास्त्र सोडलं आहे . या निवडणुकीत अजित पवार यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना बळीचा बकरा बनवले आहे, त्यांची मला दया येते अशी टीका त्यांनी केली आहे .
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मताधिक्याने विजय होणार असा मला विश्वास आहे . बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि स्वाभिमानाची लढाई आहे. यामध्ये शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाचा पराभव करुन मोदी आणि शाहांना दाखवून द्यायचं आहे की, आम्ही गुजरातच्या व्यापाऱ्यांनी पैशाच्या ताकदीवर आणि तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव केला. पण तसं होणार नाही.. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात भाजप दारुण पराभवाच्या छायेत आहे. भाजपचे अनेक विद्यमान खासदार पुन्हा लोकसभेत दिसणार नाहीत, असेही राऊत यांनी म्हटले आहे .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हा एक खोटारडा माणूस आहे. जो माणूस आपल्या स्वार्थासाठी आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसत असतो, त्यांच्यावर तुम्ही काय विश्वास ठेवता? हे डरपोक लोक आहेत, शिवसेना तुमचा पराभव करेल. मोदींना मुंबईत येऊ द्या. तरीही मुंबईत ठाकरे गटच जास्त जागा जिंकेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे