मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये (Hatkanangle Lok Sabha)पहिल्या दोन तासामध्ये चुरसीने मतदान झाले आहे . या मतदारसंघात , इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले, शाहुवाडी-पन्हाळा, इस्लामपूर आणि शिराळा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांमध्ये 8.50 टक्के मतदानाची नोंद हातकलंगले तालुक्यामध्ये झाली आहे . शिरोळ तालुक्यामध्ये (Shirol )8.20 टक्के मतदानाची नोंद झाली. इचलकरंजीमध्ये (Ichalkaranji) 7.91 टक्के मतदानाची नोंद झाली. इस्लामपूरमध्ये (Islampur)7.76 टक्के मतदानाची नोंद झाली. शाहूवाडीमध्ये( Shahuwadi) 6.21 टक्के मतदानाची नोंद झाली, तर शिराळा तालुक्यात शिराळामध्ये (Shirala)6.60 टक्के मतदानाची नोंद झाली.या मतदारसंघांमध्ये चौरंगी लढत होत असल्याने गुलाल कोणाला लागणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहचली आहे.
या हातकणंगले मतदारसंघात महायुतीकडून धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) रिंगणात आहेत . यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या तालुक्यात अक्षरशः तळ ठोकला होता .त्यांनी साखर कारखानदार, सहकारी संस्था, आजी माजी नगरसेवकांपर्यंत सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न केला . दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून हा मतदारसंघ पिंजून काढला होता .दरम्यान या मतदारसंघांमध्ये कमीत कमी 40 टक्के मतदान घेणारा उमेदवार विजयी होतो, असं आजवरचं समीकरण आहे. त्यामुळे इतक्या मतांचा पल्ला गाठण्यासाठी सर्वच उमेदवारांकडून ताकतीचे प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी विजय कोणाचा होणार यासाठी 4 जूनपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
या मतदारसंघात शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी. सी. पाटील, शेतकरी नेते रघुनाथ पाटील, शिवाजी माने अशी बहुरंगी लढत होत आहे. एकूण चुरस पाहता मताधिक्याचा आकडा किती मोठा असणार याबाबत सध्या तरी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे.