मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी( kolhapur loksabha)आज मतदान होत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ( shahu maharaj) आणि महायुतीचे संजय मंडलिक(sanjay mandlik ) रिंगणात आहेत . सकाळच्या पहिल्या दोन तासांमध्ये सर्वाधिक चुरस कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर या तीन मतदारसंघांमध्ये अधिक दिसून येत आहे. दरम्यान सकाळपासून करवीरमध्ये 11.71 टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर उत्तरमध्ये 9.68 टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर दक्षिणमध्ये 9.6 टक्के मतदानाची नोंद झाली.त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, चंदगड, कागल आणि राधानगरी-भुदरगड असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी अधिक चुरस या तीन मतदारसंघामध्ये दिसून येत आहे .त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूर दक्षिण उत्तर आणि करवीर मतदारसंघांमध्ये मतदारांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कोल्हापूरमध्ये आजपर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी सरासरी 70 टक्क्यांपर्येंत मतदान झालं आहे . आज सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. त्याचबरोबर मतदारांना मतदानापर्यंत नेण्यासाठी सुद्धा अधिक प्रयत्न केले जात आहेत . या मतदारसंघातील राधानगरीमध्ये सकाळच्या पहिल्या दोन तासात फक्त 3.50 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. चंदगडमध्ये नऊ वाजेपर्यंत 5.60 टक्के मतदानाची नोंद झाली. कागलमध्ये 8.98 टक्के मतदानाची नोंद झाली आहे .
लोकसभेसाठी गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी कोल्हापूर आणि हातकणंलगेच्या जागेवर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. सध्या कोल्हापूरमध्ये 23 उमेदवार रिंगणात असले, तरी थेट लढत शाहू छत्रपती महाराज आणि संजय मंडलिक यांच्यामध्येच आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांमध्ये काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.