पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Lok Sabha) राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . या मतदारसंघात भाजपकडून (BJP) माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) मैदानात आहेत . दोन्हींकडुन प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना आता त्यांना ऐन निवडणुकीवर मोठा धक्का बसला आहे . प्रचाराच्या खर्चाच्या पहिल्या तपासणीमध्ये तफावत आल्यांने त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आली आहे . तर दुसरीकडे महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) आणि महाआघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Ramsing Kolhe) यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहेत. .
या मतदारसंघात भाजपकडून उतरलेले मुरलीधर मोहोळांनी 33 लाख 13 हजार 402 रुपयांचा खर्च दाखवला आहे. त्यात 27 लाख 24 हजार 232 रुपयांचा खर्चाचा हिशेब जुळत नसल्याचं समोर आलं आहे . त्यानंतर धंगेकरांचं तर खर्च जुळत नाही त्यामुळे ठोस आकडेवारी मिळाली नाही, असं पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या लोकसभा उमेदवारांच्या खर्चाची माहिती ठेवली जाते आणि खर्चाची तपासणीदेखील केली जाते. त्यात सगळ्या उमेदवारांची तपासणी केली जाते या तपसणीदरम्यान त्यांच्या प्रचार खर्चात मोठी तफावत जाणवल्यानंतर उमेदवारांना थेट नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे महायुतीतील शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात आहेत .त्यांच्या खर्चातदेखील मोठी तफावत समोर आली आहे. अमोल कोल्हे यांनी 15 लाख 67 हजार 368 रुपये खर्च दाखवला आणि निवडणूक विभागाच्या नोंदवहीत 43 लाख 90 हजार 81 रुपये खर्च झाल्याचं दिसून येत आहेय त्यामुळे साधारण 13 लाख रुपयांचा हिशोब जुळत नाही आहे. त्यासोबतच त्यांच्याविरोधात उभे ठाकलेले आढळराव पाटील यांनी 19 लाख 62 हजार 160 रुपये खर्च दाखवला मात्र नोंदवहीत 43 लाख 90 हजार 81 रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. त्यामुळे त्यांच्या हिशेबातदेखील तफावत दिसून आली आहे.त्यामुळे ऐन निवडणुकीत त्यांना मोठा धक्का बसला आहे .