महाराष्ट्र ताज्या बातम्या

जयकुमार गोरे यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्तावावर खुलासा मागवला; सभापती राम शिंदे यांची माहिती

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या जयकुमार गोरे यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्तावावर खुलासा मागवल्याची माहिती दिली

मुंबई : शिवसेना सदस्य बच्चू कडू यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात दिलेला हक्कभंग प्रस्ताव आपणाकडे प्राप्त झाला असून यासंदर्भात मंत्री गोरे यांच्याकडे खुलासा मागवण्यात आला आहे. तो खुलासा प्राप्त झाल्यानंतर याबाबत सभागृहात निवेदन केले जाईल, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शुक्रवारी सभागृहात दिली.

लक्षवेधी सूचनेदरम्यान विचारलेल्या प्रश्नांना ३० जून रोजी चुकीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावाची सूचना दिली होती.

यासंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले की, लक्षवेधी सूचनेत उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ग्रामविकास मंत्री गोरे यांनी, “मी कधीही चुकीचे उत्तर देत नाही,” असे वक्तव्य केले होते. मात्र, त्या वेळी मी वारंवार सांगत होतो की, चुकीचे उत्तर दिले जात आहे. तरीही चुकीचे उत्तर देऊन सभागृहाची दिशाभूल करण्यात आली, असा आरोप कडू यांनी केला.

संगणक परिचालकांना मिळणाऱ्या रकमेबाबत मंत्री गोरे यांनी “ते पैसे कमिशन म्हणून मिळतात,” असे उत्तर दिले होते. प्रत्यक्षात संगणक परिचालकांना अशा स्वरूपाचे कमिशन मिळत नाही, याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असे कडू यांनी सभागृहात सांगितले.

संबंधित आस्थापनाला देण्यात येणारे ८४ कोटी रुपये संगणक परिचालकांना द्यायला हवेत, अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, त्या वेळीही चुकीचे आणि दिशाभूल करणारे उत्तर देण्यात आले, असा दावा कडू यांनी केला.

“चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करणे हा सभागृहाचा हक्कभंग आहे. त्यामुळे हा हक्कभंग प्रस्ताव विशेष हक्कभंग समितीकडे पाठवण्यात यावा,” अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

यावर सभापती प्रा. राम शिंदे यांनी संबंधित प्रस्तावावर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून खुलासा मागवण्यात आल्याचे स्पष्ट केले. खुलासा प्राप्त झाल्यानंतर या विषयावर सभागृहात निवेदन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात