महाराष्ट्र ताज्या बातम्या

दिवेआगर समुद्रात पुण्यातील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर दुर्घटनेनंतर एकत्र उभे असलेले आळंदीतील विनर्स अकॅडमीचे विद्यार्थी

आळंदीतील विनर्स अकॅडमीचे 30 ते 40 विद्यार्थी पर्यटनासाठी आले होते; सर्व आठ मृतदेह सापडले

श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दिवेआगर येथे समुद्रात उतरलेल्या पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, विनर्स अकॅडमीतील इयत्ता 11वी आणि 12वी विज्ञान शाखेचे सुमारे 30 ते 40 विद्यार्थी पर्यटनासाठी दिवेआगर येथे आले होते. त्यापैकी काही विद्यार्थी समुद्रात उतरले असताना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी बुडाले.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

  1. यश किरण वानखेडे
  2. सोहम तुकाराम भांडवलकर
  3. तन्मय दत्तात्रय वाहिले
  4. कौस्तुभ संदीप दौंड
  5. कैवल्य वासनकर
  6. राजवीर वहिले
  7. प्रणव बनसोडे
  8. सुमित अहिरे

सर्व आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आले असून पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

पोलीस, महसूल आणि आरोग्य यंत्रणा घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

स्थानिक वॉटर स्पोर्ट्स टीमची तत्पर मदत

घटनेची माहिती मिळताच दिवेआगर येथील भाऊ मारुती साळुंखे महाकाली वॉटर स्पोर्ट्सचे भाऊ साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने समुद्रात शोधमोहीम सुरू केली. स्थानिकांच्या मदतीने त्यांनी बुडालेल्या आठही विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले. दुर्घटनेनंतर दिवेआगर परिसरात शोककळा पसरली असून पुण्यातील विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. समुद्रात विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या परिस्थितीत पाण्याचा फटका बसला, त्या वेळी समुद्राची स्थिती काय होती आणि पर्यटन गटासोबत पुरेशी देखरेख किंवा सुरक्षा व्यवस्था होती का, याबाबत संबंधित यंत्रणांकडून पुढील चौकशी अपेक्षित आहे.

Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात