नांदेड
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे पूत्र सुजात आंबेडकर यांच्या नांदेड येथे सभेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेस नेत्यांसह इंडिया आघाडीवर निशाणा साधला.
तुम्हाला संधी दिली होती, पुन्हा रडत येऊ नका… पुन्हा रडत आलात तर ठोकून काढू असा इशारा सुजात आंबेडकर यांनी इंडिया आघाडीला दिला आहे. यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले की, दिल्लीतील एक व्यक्ती आहे जी भारत जोडो यात्रेवर निघाली आहे. मात्र भारत जोडण्यापूर्वी आधी जातीव्यवस्था तोडावी लागते. त्यासाठी आंबेडरवाद आणि बाबासाहेबांना जवळ घ्यावं लागतं.
सुजात आंबेडकर यांनी राहुल गांधीवरही टीका केली. राहुल गांधी यांना द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उघडाचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. हे प्रेमाचं दुकान छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोरममध्ये उघडणार असल्याचं ते म्हटले होते. मात्र, छत्तीसगड, राजस्थानमध्ये असलेले दुकान बंद पडलं. तर, मध्य प्रदेशमध्ये दुकान उघडण्याचीही संधी दिली गेली नाही.